Rahul Narwekar elections controversy : राहुल नार्वेकर बोलले, या लोकांनी धंदा सुरू केलाय; उमेदवारी मागे घेण्यासाठी कोटींची रक्कम मागितली...

Rahul Narwekar Reacts to Court Petitions Over Pressure in Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिका निवडणुकीत दबाव आणल्याचा व्हायरल व्हिडिओवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Narwekar elections controversy
Rahul Narwekar elections controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Municipal Election news : मुंबई महापालिका निवडणुकीत नातेवाईकांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांवर दबाव आणल्याच्या प्रकारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदाचा प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते. याबाबत, लेखी तक्रारी आणि खुलासा आम्ही करणार आहोत. मी कायद्याचा अभ्यासक आहे, कायदा काय आहे याची मला जाणीव आहे."

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचे मुंबई महापालिका निवडणुकीत मेहुणी हर्षिता शिवलकर, भाऊ मकरंद नार्वेकर आणि बहीण गौरी नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुल नार्वेकर यांनी राजकीय सत्तेचा आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि इच्छुक उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप करत, न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

राहुल नार्वेकर यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत, नार्वेकर यांना पदावरून हटवून निलंबित करण्याची मागणी करण्याबरोबर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. यानंतर खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांनी देखील नार्वेकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विरोधकांकडून वाढत्या दबावानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली.

Rahul Narwekar elections controversy
BJP Congress clash : सपकाळ महाराष्ट्रासाठी 'साप'; फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना, भाजप नेत्याची जीभ घसरली!

राहुल नार्वेकर म्हणाले, "गेली पाच दिवस ही सगळी लोकं झोपलेली होती. उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच-पाच कोटी रुपये मागण्याचे या लोकांनी प्रयत्न केले. याबाबत, लेखी तक्रारी आणि खुलासा आम्ही करणार आहोत. मी कायद्याचा अभ्यासक आहे, कायदा काय आहे, याची मला जाणीव आहे."

Rahul Narwekar elections controversy
Santosh Bangar : उमेदवार पाडा अन् 71 लाख जिंका; शिंदेंच्या शिलेदारानं पुन्हा ठोकली हाबूक!

'ज्या महिलेनं दबाव टाकल्याचे आरोप केले, त्यांना मी पाहिलेले नाही, ना कधी भेटलो आहे. जर त्या चांगल्या उमेदवार होत्या, तर तुम्हीच त्यांना उमेदवार करायला पाहिजे होते ना? पण घाणेरडे प्रकार विरोधी पक्षांकडून होत आहेत. उमेदवार उभे करायला त्यांच्याकडे हा वॉर्ड नाही. आम्ही मेहनत करत काम केलं. मात्र स्वत:साठी तिकीट घेता आलं नाही. विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 2 होती, आज 7 तारीख आहे. इतके 5 दिवस काय प्लॅनिंगमध्ये गेलेत का? हे सगळं पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे,' असेही नार्वेकर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com