

Ashok Kharat bank accounts : भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणातील आर्थिक, राजकीय, प्रशासकीय पातळीवर असलेले धक्कादायक खुलासे महाराष्ट्राला हादरून सोडणारे आहेत. रूपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणाचा मोठा राजकीय फटका बसला.
त्यानंतर दुसरा फटका बसलो तो काका कोयटे यांना. त्यांना राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. काका कोयटे यांनी राजीमाना देताना, प्रकृतीचे कारण दिले होते. परंतु आता ईडीने (ED) त्यांना दहा मे रोजी पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काका कोयटे हे समता पतसंस्थेचे संस्थापक आहेत. आजघडीला समता पतसंस्थेच्या महाराष्ट्रात 20 पेक्षा जास्त शाखा आणि 23 गोल्ड लोन काउंटर कार्यरत आहेत. संस्थेने 1000 कोटींहून अधिक ठेवी असून, Gold Loanच्या माध्यमातून सुमारे 600 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. समताची सभासद संख्या 100000 हून अधिक ग्राहक सभासद या संस्थेशी जोडलेली आहे.
अशा या पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याची वारसदार असलेली 100 हून अधिक खाती आढळली आहे. या खात्यांवर 70 कोंटीपेक्षाचा अधिक आर्थिक व्यवहार झाला आहे. हा पैसा हवाला किंवा मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरला गेल्याचा संशय आहे.
या संस्थेत रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा आणि तिचा मुलगा याचे देखील चार बँक खाती आढळली आहेत. या बँक खात्यावरून, मोठे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. प्रतिभा आणि तिच्या मुलाकडे विशेष पोलिस पथकाने चौकशी केली आहे.
या चार बँक खात्यावर 2 कोटी 70 लाखांचे व्यवहार झाले आहेत. या चौकशीत त्यांनी ही खाते बनावट सहीने उघडण्यात आल्याचा दावा केला आहे. यामुळे बँकेच्या आर्थिक विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
याच दरम्यान, काका कोयटे यांनी प्रकृतीचे कारण देत, राज्यातील 15000 पतसंस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याचवेळी काका कोयटे यांच्या राजीनाम्यामागील चर्चा रंगल्या होत्या. आता ईडीने चौकशीसाठी हजर राहाण्याचे निर्देश दिल्यावर या चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
ईडीने चौकशीला दहा मे रोजी पर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने प्रतिभा चाकणकर यांना देखील चौकशीसाठी हजर राहाण्याचे निर्देश दिलेत. यामुळे या दोघांच्या चौकशीत काय निष्पन्न होत, याकडे आता लक्ष लागलं आहे.
ईडी यासह अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिने गैरव्यवहार करून कब्जात घेतलेल्या शिर्डीतील जमीन व्यवहाराची देखील होणार चौकशी करणार आहे. या व्यवहारात बेकायदेशीर सावकारकी झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. जमीन मालक तथा फिर्यादी रावसाहेब गोंदकर, न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोघांची देखील ईडी चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.