

Ahilyanagar minor girl case : राहाता तालुक्यातील शिर्डी इथल्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी अन् पुढे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी राहाता तालुक्यातील निघोज येथील तिघांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी याला ‘द केरळ स्टोरी’सारखा प्रकार म्हटले आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपासून इरफान सलीम पठाण हा पीडित मुलीचा सतत पाठलाग करत होता. इरफानने सोशल मीडियाचा वापर करून मुलीशी संपर्क साधला. त्याने मला तू आवडते, माझ्याबरोबर लग्न कर, आमचा धर्म स्वीकार, तुला रमजान महिन्यात उपवास करावे लागतील, असे मेसेज केल्याचे पीडिताने शिर्डी (Shirdi) पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबद्दल पीडित मुलीने इरफानच्या भावजयी आयेशा पठाण यांना सांगितले असता, आयेशा आणि इरफानचा भाऊ अरबाज याने देखील इरफान सोबत लग्न करण्याचा आग्रह धरला, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान इरफानने फिर्यादीच्या घराच्या मागील बाजूस बोलावून मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी मुलीने सर्व काही आपल्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर पोलिसांत (Police) तक्रार देण्यात आली.
शिर्डी पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली आणि मुख्य आरोपी इरफान पठाण याला अटक केली आहे. इतर दोघांचा अरबाज आणि आयेशा पठाण यांचा शोध सुरू आहे. भाजप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी याला ‘द केरळ स्टोरी’सारखा प्रकार म्हटले आहे आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मुस्लिम समाजाच्या पवित्र रजमान उपवास सुरू असून, यात प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात, हिंदू-मुस्लिम एकमेकांना आमने-सामने आणणारे, असे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.