Shirdi police bribery case : वाळू वाहतुकीचा दरमहा 40 हजारांचा हप्ता! लाच घेताच हवालदाराची ACB पथकाशी रस्त्यावर झटापट; व्हिडीओ व्हायरल

A Shirdi police constable was caught accepting Rs 40,000 in an ACB trap over alleged monthly bribes for sand transport. Video shows a scuffle during the arrest : वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 50 हजारांची मागणी; तडजोडीत 40 हजार रुपये ठरल्याचा आरोप. देर्डे फाट्यावर लाच स्वीकारताना नाशिक ACB पथकाने शिर्डी वाहतूक शाखेतील अशोक शिंदे याला पकडले; पळण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांशी झटापट.
Shirdi police bribery case
Shirdi police bribery caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar corruption news : वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 40 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदाराबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकातील अधिकाऱ्यांशी रस्त्यावर झटापटी रंगली.

या कारवाईचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अहिल्यानगर पोलिस दलात कारवाईची चर्चा रंगली आहे. अशोक रामा शिंदे (वय 46) असे लाच घेतलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असला, तरी त्याची नेमणूक ही शिर्डी शहर वाहतूक शाखेत आहे.

तक्रारदार हा शेतकरी (Farmer) असून शेतीसोबतच वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याला वाळू वाहतुकीची ऑर्डर मिळाल्यानंतर 21 नोव्हेंबरला वाळू वाहतूक करत असताना पोलिस हवालदार अशोक शिंदे याने त्याचे वाहन अडविले. वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत 40 हजार रुपये घेण्याचे ठरले.

वाळू वाहतुकीची परवानगी असूनही दरमहा पैसे द्यावे लागणार, म्हणून शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) नाशिक पथकाकडे तक्रार केली. पथकाने शेतकऱ्याच्या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यात तथ्य आढळले. तडजोडीनंतर दरमहा 40 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील देर्डे फाटा (ता. कोपरगाव) येथे 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार अशोक रामा शिंदे याला पथकाने पकडले.

Shirdi police bribery case
Tukai Irrigation Scheme : लोकार्पणाचा गाजावाजा, पण वितरण कुंड कोरडाच? राम शिंदेंच्या तुकाई योजनेवर शरद पवार राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

दरम्यान, या कारवाईचा व्हिडीओ समोर आला आहे. लाच स्वीकारल्यानंतर, आपल्याभोवती लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या पथकाने सापळा लावल्याचे पोलिस हवालदार अशोक शिंदे यांच्या लक्षात आले. त्याने पैसे लपवून ठेवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने त्याला चारही बाजूने घेरले.

Shirdi police bribery case
Maharashtra Government : जलसंपदा विभागातील 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार : राज्यभर संताप; बेमुदत आंदोलनाचा इशारा

यावेळी अशोक शिंदे आणि पथकातील अधिकाऱ्यांशी चांगलीच झटापटी झाली. लाचेची रक्कम पथकातील अधिकाऱ्यांच्या हाती लागू नये, यासाठी अशोक शिंदे धडपडत होता. निसटण्याचा प्रयत्न करत होता. पथकातील पाच पोलिस अधिकाऱ्यांनी लाचखोर अशोक शिंदे याला पकडले होते. पण रक्कम सोडायला तयार नव्हता.

पथकातील पाच जणांनी पकडलेल्यांना, अशोक शिंदे रस्त्यालगतच्या फुटपाथवर घेऊन पडला. तरी पथकातील अधिकाऱ्यांनी अशोक शिंदे याला काबूत ठेवले. त्याच्याकडून लाचेची रक्कम काढली. ही झटापट बराच वेळ चालू होती. तसा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक शिंदे याचा पळून जाण्याचा प्रयत्न होता. ताब्यात घेतल्यानंतर कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.