

Artificial flower ban demand : अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रीगोंदा इथले भाजप आमदार विक्रम पाचपुते कृत्रिम फुलांचे गुच्छ घेऊन पोहोचले. आमदार पाचपुते यांच्या या स्टंटमागे नेमकी काय भूमिका होती, याची सर्वत्र चर्चा होती.
एकीकडे मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच, सत्ताधारी आमदार कृत्रिम फुलेंचे गुच्छ हातात घेऊन विधिमंडळात आवारात नेमके कशासाठी आले, याची चर्चा सुरू असतानाच, यावर आमदार पाचपुतेंनी स्वतःचा खळबळजनक दावा केला.
कृत्रिम फुलांवर वापरल्या जाणाऱ्या टॉक्सिक रंगांमुळे वायू प्रदूषण वाढते आहे. तसंच उद्भवणारे श्वसनाचे आजार तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा वाढता प्रादुर्भाव देखील होतो. त्यामुळे या कृत्रिम फुलांवर बंदी घालावी, अशी आपली मागणी असल्याचे भाजप (BJP) आमदार पाचपुते यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या (Maharashtra Budget) आवारात माध्यमांशी संवाद साधताना, विक्रम पाचुपते म्हणाले, "कृत्रिम फुले जेव्हा मार्केटमधून आणतो, तेव्हा ती आकर्षक रंगाने बहरलेली असतात. पण कालांतराने त्यावरील रंग उडून जातो. मग हा रंग कुठे जातो? या फुलांवरील रंग नॅनोपद्धतीने म्हणजेच अति सूक्ष्म स्वरूपात हवेत मिसळतो. आणि तो श्वसनाद्वारे मानवी शरीरात जाऊन आरोग्यास हानीकारक ठरतो. हे जगभरातील संशोधनावरून समोर आलं आहे."
'कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देणारी ही फुलांबरोबर फुगे देखील तेवढीच घातक आहेत. पुढील काळात होळी आहे. रंगपंचमी आहेत. तिथं देखील कृत्रिम रंगांचा वापर होतो. हे हनीकारक असंच आहे. याबाबत कायदे अनेक आहे. पण त्यातील शिक्षेचे प्रमाण कमी आहे. यात तर दुर्दैवाने शिक्षेचे प्रमाणच नाही. यावर सरकारने कायदेशीर करावी,' अशी मागणी विक्रम पाचुपते यांनी केली.
फुल, फुग्यांबरोबरच खेळींचा रंग देखील उन्हात उडतो. इतकी घातक खेळणी आपण लहान मुलांच्या हातात देतो. ही मुलं खेळणी तोंडात देखील घालतात. त्यामुळे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे. यावर आवाज उठवला गेला पाहिजे. बनावट पनीरचा मुद्दा गेल्यावेळेस उपस्थित केला होता. त्यावरून राज्यभरात सोशल संदेश गेला होता. त्याचपद्धतीने याबाबत देखील माध्यमांनी यावर आवाज उठवावा, असे आव्हान देखील आमदार पाचपुते यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.