Sugar Factory Elections : अहिल्यानगरच्या सहकाराच्या राजकारणात राजकीय रणधुमाळी; ‘ज्ञानेश्वर’, ‘मुळा’ अन् ‘वृद्धेश्वर’ची निवडणूक रंगणार

Rajale-Ghule-Dhakane equations dominate Ahilyanagar Vruddheshwar Mula Dnyaneshwar sugar factory politics ahead cooperative elections : नेवाशातील 'ज्ञानेश्वर', 'मुळा' आणि पाथर्डीमधील'वृद्धेश्वर' सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Sugar Factory Elections
Sugar Factory ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar cooperative politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार राजकारण पुन्हा एकदा तापू लागले असून, जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

नेवासे तालुक्यातील ‘ज्ञानेश्वर’ आणि ‘मुळा’, तर पाथर्डी तालुक्यातील ‘वृद्धेश्वर’ सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांच्या निवडणुका लागल्याने जिल्ह्यात एकप्रकारे निवडणुकीचा उत्सवच सुरू झाला आहे.

‘मुळा’ आणि ‘वृद्धेश्वर’साठी 26 जून रोजी मतदान (Election) होणार असून, ‘ज्ञानेश्वर’साठी 27 जून रोजी मतदान (Voter) पार पडणार आहे. त्यामुळे सहकार आणि स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू आता या तिन्ही कारखान्यांभोवती फिरताना दिसत आहे.

पाथर्डी तालुक्यातील ‘वृद्धेश्वर’ सहकारी साखर कारखान्याची (Sugar Factory) निवडणूक यंदा विशेष चर्चेत आहे. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे यांच्या भोवती या निवडणुकीची संपूर्ण समीकरणे फिरत आहेत.

Sugar Factory Elections
MLC Election 2026 : विधान परिषद रणधुमाळी! तनपुरे-विखे आमनेसामने? साडेतीन वर्षांनी रिक्त जागेवर राजकीय महासंग्राम

विशेष म्हणजे, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकमेकांविरोधात मैदानात उतरणारे हे नेते साखर कारखान्यांच्या निवडणुकीत मात्र ‘सहकारा’चा फॉर्म्युला वापरत असल्याचे चित्र अनेक वर्षांपासून दिसत आले आहे. त्यामुळे यंदाही ‘वृद्धेश्वर’ची निवडणूक बिनविरोध होणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sugar Factory Elections
Andekar gang in Ahilyanagar : पुण्यातील आंदेकर टोळीची थेट अहिल्यानगरात एंट्री? उद्योजकावर कोयत्याने हल्ला अन् गोळीबाराचा संशय? 5 जण अटकेत, पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त

सुमारे आठ हजार सभासद असलेल्या ‘वृद्धेश्वर’ कारखान्यात विद्यमान संचालकांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे संपूर्ण कारखाना वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार मोनिका राजळे यांची पुढील रणनीती या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे.

सध्या ‘वृद्धेश्वर’वर आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व मानले जाते. नेवाशातील ‘ज्ञानेश्वर’वर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मजबूत पकड आहे, तर सोनईतील ‘मुळा’ सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे प्रभावी नियंत्रण कायम आहे. प्रताप ढाकणे यांच्या प्रभावक्षेत्रातील ‘केदारेश्वर’ कारखान्याचाही सहकार राजकारणात स्वतंत्र दबदबा आहे. राजकीय समीकरणे बदललेल्या पार्श्वभूमीवर यंदा या कारखान्यांच्या निवडणुका पुन्हा बिनविरोध होतात की प्रत्यक्ष लढती रंगतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर

तिन्ही कारखान्यांसाठी 26 मे ते 2 जूनदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

3 जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, 18 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

19 जून रोजी चिन्हवाटप होणार आहे.

निवडणूक लागल्यास :

‘मुळा’ आणि ‘वृद्धेश्वर’साठी 26 जून रोजी मतदान

‘ज्ञानेश्वर’साठी 27 जून रोजी मतदान

‘मुळा’ आणि ‘वृद्धेश्वर’ची मतमोजणी 27 जून रोजी

‘ज्ञानेश्वर’ची मतमोजणी 28 जून रोजी होणार आहे.

सहकारातून राजकारणाचा नवा संदेश?

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार राजकारण हे नेहमीच विधानसभा राजकारणाचे ट्रेलर मानले जाते. त्यामुळे ‘ज्ञानेश्वर’, ‘मुळा’ आणि ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुका केवळ कारखान्यापुरत्या मर्यादित न राहता आगामी जिल्हा राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत. आता या निवडणुकांत पुन्हा एकदा ‘सहकारा’चा फॉर्म्युला यशस्वी ठरतो की थेट राजकीय सामना रंगतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com