Ahmednagar DCC Bank: अहमदनगर जिल्हा बँकेचं राजकारण तापलं,भाजप नेत्यानं मतदानासाठी भावालाच पळवलं; पारनेरमध्ये गुन्हा दाखल

Parner Crime News: पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे यांनी त्यांच्या भावाला मतदानासाठी पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Parner News: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सध्या जिल्ह्यात सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांमधून मतदानासाठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याचदरम्यान, पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे यांनी त्यांच्या भावाला मतदानासाठी पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,सुभाष दुधाडे हे लोणी हवेली येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात. तसेच ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ठरावासाठी 13 जुलै रोजी निवडणूक होणार होती, त्यासाठी संचालक मंडळ मतदान करणार आहे. या मतदानात त्यांचे भाऊ शिवाजी चांगदेव दुधाडे हे मतदार आहेत.

दुधाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 जुलै रोजी सायंकाळी सुमारे सात वाजल्यापासून त्यांचे भाऊ शिवाजी दुधाडे हे बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, रात्री सुमारे 9.51 वाजता गावातील अमोल विक्रम दुधाडे, जो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा कार्यकर्ता आणि विद्यमान उपसरपंच याने संभाजी दुधाडे यांना फोन करून शिवाजी आप्पांना कोणत्या गोळ्या चालू आहेत, ते सांगा. ते माझ्यासोबत आहेत, असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर सुभाष दुधाडे, संभाजी दुधाडे आणि इतर नातेवाईकांनी शिवाजी दुधाडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तसेच अमोल दुधाडे यांचाही मोबाईल बंद आढळून आल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलंआहे.

BJP
Eknath Khadse News: मोठी बातमी: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा पुढचा राजकीय धक्का; ठाकरेंच्या भेटीसाठी थेट गाठली 'मातोश्री'

शिवाजी दुधाडे हे घरी परतले नसून, सोसायटीच्या ठराव बैठकीत त्यांनी त्यांच्या पसंतीच्या गटाला मतदान करू नये, या उद्देशाने अमोल दुधाडे यांनी त्यांना पळवून नेऊन कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे

याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. तसेच जिल्हा बँकेच्या ठरावावरून यापूर्वी पाडळी रांजणगाव येथील संचालकांना पळून नेल्याचा गुन्हा सुपे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ठराव आपल्याच बाजूने व्हावा यासाठी अनेक गावांमध्ये संचालकांना दमबाजी केली जात असल्याचे चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com