MLA Nilesh Lanke News : होय...मी गुंड आहे!'; नीलेश लंके कडाडले

Ahmednagar Lok Sabha Constituency : लंकेंनी शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित केले तडाखेबाज भाषण.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Nagar News : नीलेश लंके यांनी नगर शहरातील दहशत मोडून काढण्याचा विश्वास देत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'अनिलभैया असते, तर मला नगरमध्ये फिरण्याची गरज पडली नसती. अनिलभैयांच्या तालमीत आपण तयार झालो आहोत. नगरवासीयांसह व्यापाऱ्यांना त्रास झाल्यास हा नीलेश लंके 24 तास 365 दिवस आपल्या सेवेत असेल. माझ्यावर गुंड असल्याचा आरोप केला जातो. होय मी गुंड आहे. कारण माझ्यात गुंडगिरीविरोधात लढण्याची धमक आहे", असा तडाखेबाज इशारा नीलेश लंके यांनी विरोधकांना दिला.

नीलेश लंके यांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोपाला तडाखेबाज भाषण केले. या वेळी लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, रोहित पवार, राजेंद्र फाळके, दादा कळमकर, विक्रम राठोड, राहुल जगताप, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, किरण काळे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Vikhe Patil Vs Pawar: खोटं बोल पण रेटून बोल, हाच पवारांचा धंदा; विखेंचा पलटवार

लंके म्हणाले, 'जनसंवाद यात्रा ही नगर (Nagar) दक्षिणमधील भौगोलिक आणि नागरिकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी होती. नगर दक्षिणमध्ये विकासाचे पर्व सुरूच झालेले नाही, असे दिसले. खूप काम करायचे आहे. यासाठी नगरकरांच्या साथीची गरज आहे. परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतली आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे". नगर शहर ही आनंदऋषीजी महाराजांची भूमिका आहे. शहरात विकास खुंटला आहे.

रेल्वेसेवेपासून ते सरकारी संस्थांपर्यंत नगरमध्ये काहीच झालेले नाही. साधे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय झालेले नाही. पाच वर्षांत एकाही विकासाचे काम केले नाही, ते निवडणुकीला (Election) विकासाच्या मुद्द्यावर समोरे जात नाहीत. व्यक्तिगत बोलत सुटले आहे. हे त्यांचे नैराश्य आहे. व्यक्तिगत टीका करताना समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येत नाही, असे प्रचार केला जात आहे. परंतु तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार हवा की, काम करणारा खासदार हवा. रिझल्ट देनेवाला चाहिएे की, ना रिझल्ट देनेवाला चाहिएे! नीलेश लंकेंनी काय विकासकामे केली, असा प्रश्न केला जातो, तर माझ्या मतदारसंघात जाऊन बघा. तुम्ही 50 ते 60 वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहात. या कालावधीत तुम्ही काय चागलं काम केले ते तरी सांगा. यांच्या घराकडे जाणारा नगर-मनमाड रस्ता यांना नीट करता आला नाही, असा टोला नीलेश लंके यांनी लगावला.

Nilesh Lanke
Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबतचा अजितदादांचा दावा पवारांनी फेटाळला; भाजपसोबत जाण्याची इच्छा...

गुंडांसाठी आपण गुंडच...

अनिलभैया यांच्या आठवणींना नीलेश लंके यांनी उजाळा दिला. नीलेश लंके जे बोलतो, तेच करतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझ्यावर गुंड असल्याचा आरोप केला जातो. होय आहे आम्ही गुंड. गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे. गुंडांना गुंड आहे. तुमचे एेकले नाही म्हणून आम्ही गुंड काय? शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी सुपा एमआयडीसी दिली. ही एमआयडीसी टिकवण्यासाठी आम्ही उद्योजकांना संरक्षण दिले.

आज ही सुपा एमआयडीसी चाकण रांजणगावपेक्षा मोठी झाल्याचा दावा नीलेश लंके यांनी केला. दहशत आणि दादागिरीची जी भाषा तुम्ही बोलता, त्या राहात्यामध्ये काय चालले आहे, ते बघा, असे सांगून नीलेश लंके यांनी समोरच्यांच्या गुंडगिरीचा पाढाच वाचला. राजकारण आनंदाने खेळले पाहिजे. परंतु दादागिरी आणि दहशतीने खेळल्यास निवडणूक जनता हातात घेते. नगर दक्षिणची निवडून जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या दादागिरी आणि दहशतीला जनताच पूर्णविराम देणार आहे, असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

Nilesh Lanke
Chhatrapati Sambhajinagar Constituency : 'माझ्यासाठी राजसाहेबांची सभा घ्या, निवडून आल्यावर पहिले त्यांच्या दर्शनाला येईन...'

...अन् जायंट किलर विजय!

नीलेश लंके यांनी तडाखेबाज भाषणात जनतेने एकदा विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. तुमच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. अभिमान वाटेल, असे काम करू. महाराष्ट्राला स्वाभिमान दिल्लीला दाखवून देऊ. पवार, थोरात आणि ठाकरे साहेबांच्या हा वाघ दिल्लीत कसा गुरगुरतो, हे तुम्हाला दिसेल. विजयाच्या निकालाच्या बातमीत जायंट किलरचा विजय, असं झाले पाहिजे.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com