Arvind Kejriwal News : भाजप-आपचे कार्यकर्ते भिडले, 12 जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Aap Bjp Worker Clash : नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भाजप कार्यालयासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
clash between aap and bjp worker
clash between aap and bjp workersarkarnama
Published on
Updated on

आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने अटक केली. यावरून आपचे देशभरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. नगरमध्ये देखील आपचे कार्यकर्ते आक्रमक होते. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भाजप कार्यालयासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील आपच्या कार्यकर्त्यांना भिडले. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी 12 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप कार्यकर्त्यांचा हा गोंधळ सुरू असताना भाजप कार्यालयात काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसले होते. आपच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे भाजपच्या कार्यकर्ते देखील भाजप कार्यालयातून बाहेर आले. नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, महेश नामदे, वसंत लोढा, रामदास आंधळे, मयूर बोचूघोळ, प्रशांत मुथा याप्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते आपच्या कार्यकर्त्यांना समोरे गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप आणि आपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानंतर तिथे जोरदार घोषणाबाजी झाली. नगर शहरातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयातून झेंडे आणत आपच्या कार्यकर्त्यांना भिडले. यातून गोंधळ वाढत गेला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कोणीही ऐकायला तयार नव्हते. या प्रकाराची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. कोतवाली पोलीस मोठ्या बंदोबस्तासह भाजप कार्यालयासमोर आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तिथे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

clash between aap and bjp worker
Arvind Kejariwal News : केजरीवालांसाठी इंडिया आघाडी मैदानात; निवडणूक आयोगाची घेतली भेट!

पोलीस आल्यानंतर आपचे कार्यकर्ते भाजपच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले. यानंतर कोतवाली पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सूर्यभान आघाव (रा. खेडले परमानंद, ता. नेवासा), जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोजकुमार गोपाळे (रा. गुणारे, ता. पारनेर), नगर शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ (रा.सावेडी), संतोष नवलखा (रा. तपेश्र्वर गल्ली, ता. जामखेड), भैरवनाथ भारस्कर (रा. तरवडी, ता. नेवासा), जिल्हा संघटक सुभाष श्रीमंत केकाण (रा. अकोला, ता. पाथर्डी), राजेंद्र कर्डिले (रा. नगर), गणेश मधुकर मारवाडे (रा. सांगळेगल्ली, नगर) यांच्यासह 12 जणांविरोधात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

clash between aap and bjp worker
Arvind Kejriwal News : केजरीवाल हेच किंगपिन; 45 कोटी हवालामार्फत गोव्यात पाठवले, ईडीचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com