कथित मद्य गैरव्यवहार प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना सक्तवसुली संचालनालयानं ( ईडी ) गुरुवारी रात्री अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री केजरीवालांना अटक केल्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अटकेनंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ईडीनं अरविंद केजरीवालांना ( Arvind Kejriwal ) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केलं. या वेळी माध्यमांनी केजरीवालांना काही प्रश्न विचारले. त्यातील एका प्रश्नावर उत्तर देताना मोजक्या शब्दांत केजरीवालांनी प्रतिक्रिया दिली. "माझे जीवन देशाला समर्पित आहे. तुरुंगात असलो, तरी देशासाठी काम करत राहणार," असा निर्धार केजरीवालांनी व्यक्त केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांना अटक"
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. "सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. सताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या दोन मुख्यमंत्र्यांना काही दिवसांच्या आतच केंद्र सरकारनं अटक केली आहे," असं पत्र 'इंडिया' आघाडीनं निवडणूक आयोगाला दिलं आहे.
"पंतप्रधान सर्वांना चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत"
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी 'एक्स' अकाउंटवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. "तीनदा निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी सत्तेच्या अहंकारातून अटक केली आहे. पंतप्रधान मोदी सर्वांना चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. हा दिल्लीतील जनतेचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्री जनतेच्या नेहमी पाठीशी उभे राहिले आहेत. तुरुंगात असो वा बाहेर, त्यांचे जीवन देशासाठी समर्पित आहे. जनतेला सर्व माहिती आहे. जय हिंद," असं सुनीता केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.