Prataprao Dhakane News : अनावरण 'तुतारी'चे, प्रतापरावांनी भाजप आमदार राजळेंवर तोफ डागली

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाच्या पाथर्डीतील अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी विधानसभेची चाचपणी केली.
MLA Monika Rajale, Pratap Dhakane
MLA Monika Rajale, Pratap DhakaneSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाच्या पाथर्डीतील अनावरण कार्यक्रमातून पक्षाचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी विधानसभेची चाचपणी केली. प्रतापराव ढाकणे यांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यावर थेट हल्ला चढवला. 'शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आमदार कर्तबगार नसून टक्केवारी आमदार आहे', असा घणाघात आरोप ढाकणे यांनी करत खळबळ उडवून दिली.

प्रतापराव ढाकणे (Prataprao Dhakane) यांनी आमदार राजळे यांच्या कार्यपद्धतीवरचे पोस्टमार्टमचे केले. ढाकणे म्हणाले, "आमदार राजळेंनी कोट्यवधींची मतदारसंघात विकासकामे केल्याची बॅनरबाजी केली. हे कोटी रुपयांचे आकडे हे खोटे आणि फसवे असल्याचे मी सिद्ध करायला तयार आहे. आमदार राजळे यांनी गेल्या निवडणुकीत बाराशे कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा केला आहे. याचा हिशोब मागितला, तर तो दिला जात नाही असे ते म्हणाले.

MLA Monika Rajale, Pratap Dhakane
Monika Rajale : एकहाती सत्ता तरी मोनिका राजळेंचा कस लागणार; समर्थकांनीच वाढवली डोकेदुखी

आजही मतदारसंघात मोठे कामे केल्याची बॅनर दिसतात कुठे आहेत, जी झाली कामे झाली त्यांचा दर्जा काय आहे. मी मतदारसंघात फिरताना लोकांनी मला त्या कामांचा दर्जा दाखवला मी स्वतः तपासला. माझ्याकडे प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक आहेत आणि त्या कामांचा दर्जाच तपासल्यावर ते अंदाजपत्रकाला किती हरताळ फासला जातोय हे ताबडतोब लक्षात येते, असेही ढाकणे यांनी सांगितले.

मागील दहा वर्ष या मतदारसंघाची वाया गेली. जनतेचा पैसा विकासाच्या नावाखाली पाण्यात गेला आहे. माझे आरोप खोटे असतील, तर सिद्ध करा. सिद्ध केल्यास मी राजकारण सोडून देईल, असे सांगत खुल्या चर्चेसाठी ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी आव्हान दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भ्रष्टाचार हीच आता मोदी आणि भाजपची गॅरंटी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज स्वतःची गॅरंटी देशाला देत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावाची गॅरंटी का देत नाहीत. आज हजारो तरुण-तरुणी बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराचे गॅरंटी का, देत नाहीत. काहीसा तसाच प्रकार या मतदारसंघात सुद्धा चालू आहे. या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारणाच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून अनागोंदी माजवली जात आहे.

भ्रष्टाचार हीच आता मोदी आणि भाजपची(bjp) गॅरंटी म्हणायची का? त्यामुळे आता लोकांनी या सगळ्या विषयांचा गांभीर्याने विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रतापराव ढाकणे यांनी केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

MLA Monika Rajale, Pratap Dhakane
Vasant More Resign MNS : ‘लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हती पसंत’ : रूपाली ठोंबरेंकडून मोरेंच्या निर्णयाचे स्वागत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com