Ahmednagar To Be Renamed : मोठी बातमी ! अहमदनगरचं नाव लवकरच बदलणार; महापालिकेत ठराव मंजूर

Punyashlok Ahilyadevi Nagar : अहमदनगर जिल्ह्याचे नाव लवकरच 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' होणार, प्रशासकीय घडामोडींना वेग, नामांतराच्या ठरावाला नगर महापालिकेची मंजुरी
Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. नगर महापालिका प्रशासनाने प्रशासकीय सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर केला आहे. प्रशासक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात प्रशासकीय सर्वसाधारण सभा झाली. या सभेत झालेला हा ठराव तातडीने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. (Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित एका वर्षभरापू्र्वी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता.जामखेड) येथे जयंतीच्या कार्यक्रमात नामांतराची घोषणा केली होती. भाजप आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी धनगर समाजाच्यावतीने नगर जिल्ह्याचे नामांतर करण्याचा ठराव या कार्यक्रमात मांडला होता. यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराचा मुद्दा लावून धरला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Politics : टक्केवारीशिवाय 'गतिमान' सरकारमध्ये काम होत नाही; आमदार तनपुरेंचा घाणाघात

शिक्षण मंत्री दीपक केसकर (Deepak Keskar) यांनी अधिवेशनातच स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराव करण्यास, रेल्वे आणि टपाल विभागाकडून ना हरकत मागवल्याचे जाहीर केले होते. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर होता.

हा निर्णय त्यांनी त्यावेळी प्रलंबित ठेवला. विषय महासभेपुढे आणलाच नाही. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने 28 डिसेंबरला नगर महापालिकेला पत्र पाठवून ठराव करण्याची सूचना केली. परंतु महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली. महापालिकेत प्रशासक राज आले. स्थायी समितीसह महासभेचे सर्व अधिकारी हे प्रशासकाककडे आले आहेत.

प्रशासक आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय महासभा झाली. यात अहमदनगरचे (Ahmednagar) नामांतर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाचा ठराव प्रशाकीय महासभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव तातडीने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे हा प्रस्ताव जाईल. त्यामुळे अहमदनगरच्या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Ahmednagar Municipal Corporation
Kopargaon Politics: विवेक कोल्हेंची तोफ मंत्री विखे, आमदार काळेंवर धडाडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com