Maharashtra Samruddhi Mahamarg : उद्घाटन PM करणार की CM ? राजकीय गोंधळामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

Samruddhi Mahamarg inauguration delayed : बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा खुला करुन महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला मोठी भेट मिळेल अशी आशा होती. मात्र राजकीय गोंधळामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर पडले आहे.
Samruddhi Mahamarg inauguration delayed
PM Modi, CM FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government News : १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला होता. पण महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले नाही, लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचे नेमके कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा खुला करुन महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला मोठी भेट मिळेल अशी आशा होती. मात्र, एमएसआरडीसी कडून सर्व नियोजन पूर्ण असूनही केवळ राजकीय गोंधळामुळे नाशिकहून मुंबईकडे जलद प्रवासाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Samruddhi Mahamarg inauguration delayed
Ajit Pawar Politics : शरद पवारांना धक्क्यावर धक्के ; दोन माजी मंत्री, तीन आमदारांपाठोपाठ अजित पवारांनी जिल्हाध्यक्षही लावला गळाला

एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ६२५ किलोमीटरचा महामार्ग हा या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पण बाकी आहे.

समृद्दी महामार्गाच्या तिसऱ्या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं. पण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट-२०२५’ चे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार का, अशी चर्चा सुरु झाली. पंतप्रधान मुंबईत आले, पण समृद्धीचे उद्घाटन मात्र पुढे ढकलले गेले.

Samruddhi Mahamarg inauguration delayed
Shivsena UBT : अनिल गोटेंच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटात खदखद कायम; माजी आमदार आज घड्याळ हातात बांधणार

समृद्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या व अत्यंत आव्हानात्मक अशा टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

हा टप्पा इगतपुरी ते आमण (७६ किमी) असून, यामुळे नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासात पूर्ण होणार आहे. ७०१ किमी लांबीच्या या महामार्गातील ६२५ किमीचा भाग आधीच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. शेवटचा टप्पा पूर्ण असूनही केवळ उद्घाटनाच्या राजकीय समीकरणांमुळे तो अद्याप वापरात येऊ शकलेला नाही, ही खेदजनक बाब असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com