Ahmednagar Politics : अजितदादांनी पुरवणी बजेटमध्ये सर्व आमदारांना केले "मालामाल"; पण मूळ विकासकामांच्या निधीचे काय ?

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री झालेल्या दादांनी पुरवणी बजेटच्या निमित्ताने कुणाला काय दिले याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar : अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत शिंदे-फडणवीस युती सरकारमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणाकडे किती आमदार आहेत हे दोन्ही गटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. स्वतः अनेक आमदार निष्ठा साहेबांवर सांगत मतदारसंघ विकासकामांच्या निधीसाठी दादाच तारणहार असल्याने त्यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. आणि याच कारणास्तव नगर जिल्ह्यातील मूळ सहा आमदारांपैकी चार आमदार ना-ना कहते का होईना दादांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) हे राज्यातील धुरंधर नेतृत्व आहे आणि हे विरोधी पक्षाचे नेतेही अमान्य करत नाही. अशा परिस्थितीत अनेक आमदार अजित पवारांसोबत जाणे याकडे विविध अंगाने पाहिले जात असले तरी दादांच्या सोबत गेलेले आमदार फक्त आणि फक्त विकासकामांच्या निधीसाठी घेतलेला निर्णय असे सांगत एक अपरिहार्यता व्यक्त करत आहेत.

Ajit Pawar
Uddhav Thackeray Meet Ajit Pawar : अजित पवारांची भेट का घेतली? उद्धव ठाकरे म्हणाले, "चुकीचा पायंडा.."

राष्ट्रवादीतून शिंदे-फडणवीस सरकारच्या 'महायुती' सरकारमध्ये शिंदे गटाच्या प्रचंड विरोधानंतरही अर्थमंत्रिपद आणि तेही फडणवीस यांच्याकडे असलेले मिळणे अजितदादांचा रुतबा कायम असल्याचे दर्शवणारे आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री झालेल्या दादांनी पुरवणी बजेटच्या निमित्ताने कुणाला काय दिले याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्याचा विचार करता बारा विधानसभा मतदारसंघात अजितदादांनी अर्थमंत्री या नात्याने निधीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सर्वच 'आपल्या-परक्या' आमदारांना समान म्हणा वा कुणाबद्दल दुजाभाव केल्याचे दिसून येत नाही. असे असले तरी दादांसोबत गेलेल्या आमदारांनी मात्र मिळालेला 20-25 कोटींचा भरीव निधी पदरात पाडून घेतल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. तर रोहित पवार, प्राजक्त तनपुरे याबाबत काहीसे अबोल दिसून येत आहे. तनपुरे यांच्या राहुरी मतदारसंघात 25 कोटींचा निधी रस्ते कामांसाठी पुरवणी बजेट मध्ये मंजूर झाल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून समजले आहे.

Ajit Pawar
NCP Crisis News: भुजबळांनंतर शरद पवारांचा मोर्चा प्रफुल्ल पटेलांकडे; २८ जुलैला गोंदियात बोलवला मेळावा

जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघाचे बारा आमदार नसताना काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, लहू कानडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार, प्राजक्त तनपुरे आणि ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांनी बाकीच्या आमदारांना पुरवणी अर्थसंकल्पात साधारण 20 कोटींच्या आसपास निधी मिळाला असला तरी त्याच्या प्रसिद्धी वा बातम्या केलेल्या दिसत नाहीत.

आपण घेतलेला निर्णय किती योग्य हे सांगण्याचा प्रयत्न पुरवणी बजेट मंजूर निधीतून होत असल्याचे सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधी सांगताना दिसून येत आहे. यात अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांसह भाजपचे आमदारही पुढे आहेत. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी 27 कोटींवर निधी मिळाला आहे. एकंदरीत नगर जिल्ह्याचा विचार करता सरासरी प्रत्येक आमदारांसाठी 20 कोटींचा अर्थसंकल्प पुरवणी निधी प्रस्तावित आहे. त्यात अकोले विधानसभा आदिवासी(ट्रायबल) असल्याने 90 कोटींपेक्षा अधिकचा निधी या मतदारसंघाला आहे. याचा अर्थ नगर जिल्हयाला जवळपास 350 कोटींचा निधी आलेला आहे. हा निधी प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांचा आहे. (Ahmednagar Politics )

Ajit Pawar
Kirit Somaiya Viral Video : ''...नाहीतर तुमचाही सोमय्या होईल!''; विधानभवनात नेते, आमदारांमध्ये कुजबूज

त्यामुळे दीर्घकालीन, प्रलंबित, मतदारांना आश्वासित केलेल्या कामांचे काय हा प्रश्न अजून प्रलंबित दिसून येत आहे. अकोल्यासाठी एमआयडीसी बाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आमदार लहामटे यांना आश्वासित केले आहे. लवकरच जागेची पाहणी करून अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय केला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांनी लहामटे यांना आश्वासन दिले आहे.

मात्र, विरोधक विधानसभेला एक वर्षे बाकी असताना हे कसे शक्य आहेत म्हणून पोकळ आश्वासन असल्याचे सांगत आहेत. हीच परस्थिती इतर मतदारसंघातील असून घेतलेल्या निर्णयाने प्रत्यक्षात विकासकामांबाबत पदरात आश्वासनाखेरीज इतरही काही पडणार आहे का हा खरा प्रश्न आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com