Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या पक्षात होत असलेले मातब्बरांचे प्रवेश वाढवणार शिंदे गटाची डोकेदुखी?

Ajit Pawar Party Entry in Jalgaon, Shinde Group facing political setback : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटात होणारं हे मोठं इनकिमिंग राष्ट्रवादीला बळ देणारं असलं तरी ते शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे.
Ajit Pawar| Eknath Shinde
Ajit Pawar| Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जळगावच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडणार आहेत. दोन माजी मंत्र्यांसह काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी सोडून अजित पवार यांचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटात होणारं हे मोठं इनकमिंग राष्ट्रवादीला बळ देणारं असलं तरी ते शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे. त्याचं कारण असं की, शरद पवार यांचा पक्ष सोडून अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील आणि इतर माजी आमदारांची राजकीय पार्श्वभूमी पाहाता हे सर्व शिंदे गटाचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत.

Ajit Pawar| Eknath Shinde
Chhagan Bhujbal Politics: समर्थकांचा दावा, जातनिहाय जनगणनेचे श्रेय छगन भुजबळ यांचेच!

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील पक्षप्रवेश गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला होता. मात्र उद्या देवकर यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील हे सगळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट महत्वाचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर हे सगळे पूर्वीचे मतभेद विसरून लगेच शिंदे गटाशी जुळवून घेतील का हा मोठा प्रश्न आहे. तसे नाही झाले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये हेच लोक शिंदे गटाची डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे जळगावात शिंदे गटात राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Ajit Pawar| Eknath Shinde
Gulabrao Patil Politics: गुलाबराव पाटील संतप्त; हम करे तो कॅरेक्टर ढिला... ‘पावन’ होऊ पाहणाऱ्या ‘गुलाबा’च्या काट्यांनी फुलांचा प्रस्थापित राजा रक्तबंबाळ!

जळगाव जिल्ह्यात महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात आहे. त्यामुळे शिंदे गटाला रोखण्यासाठी भाजपकडूनच अजित पवार यांना बळ दिले जात असल्याची शंका घेतली जात आहे. कारण, शिंदे गटाचे आमदार असलेल्या जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, पाचोरा, चोपडा या मतदारसंघावरच अजित पवार यांचा डोळा आहे. भाजपचे आमदार ज्या मतदारसंघात आहे, तिथे अजित पवारांच्या कोणत्याही हालचाली नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com