Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरीवर राष्ट्रवादीने ठोकला दावा!

Ajit Pawar NCP politics in Nashik : मुंबईच्या बैठकीत अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या जागेवर ठोकला दावा. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात नाशिक मतदारसंघावरून नवा अडथळा निर्माण होऊ शकतो.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट ) आता शिवसेना (शिंदे गटाच्या) जागेवरच दावा ठोकला आहे. कोणत्या स्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात नाशिक मतदारसंघावरून नवा अडथळा निर्माण होऊ शकतो.politics in Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल मुंबईत झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघाचे जागावाटपाचे काम प्रमुख विषय होता. या वेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील Lok sabha Election 2024 पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने गेलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या वेळी नाशिक आणि दिंडोरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी मागणी केली. या वेळी काही कार्यकर्त्यांनी उमेदवार दिला तो कसा विजयी होईल, याचे गणितदेखील मांडले. हे गणित मांडताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे मतदार आणि जागावाटप त्याच्यावरील प्रभाव याचा आधार घेतला. त्यामुळे आगामी काळात पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Loksabha Election 2024 : हीना गावित यांना भाजपच्या प्रस्थापितांचा विरोध; काँग्रेसमध्ये आनंदाच्या उकळ्या...

जिल्ह्यातील नाशिक या लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटात झालेल्या तडजोडीमध्ये शिंदे गटाने हा मतदारसंघ स्वतःकडे मागितला आहे. गोडसे यांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. असे असताना रोज नवे दावे केले जात आहेत. त्यामुळे गोडसेदेखील अस्वस्थ आहेत. काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे भाजप आणि शिंदे गट दोन्हींना नव्या समस्यांना सामोरे जावे लागते की काय अशी स्थिती आहे.

अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते निवृत्ती अरींगळे हे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. कालच्या बैठकीत त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. बैठकीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate) आणि सरोज अहिरे (Saroj Ahire ) असे दोन आमदार आहेत. याशिवाय जिल्ह्यात एकूण सहा आमदार असल्यामुळे अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत किमान आमदार संख्येप्रमाणे मतदारसंघ मिळाले पाहिजेत. जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) आणि नाशिक (Nashik) या दोन्ही मतदारसंघात उमेदवार दिल्यास ते हमखास विजयी होतील, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. अजित पवार यांनीही जागावाटपात या जागांसाठी आग्रह धरू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.

येत्या आठवड्यात नऊ मार्चला महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा काल महाराष्ट्र दौरा झाला आहे. या दौऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जागावाटपात भाजपला जास्तीत जास्त जागा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे (NCP) अजित पवार गट या दोन्हींची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत पुरेशा जागा न मिळाल्यास महायुतीच्या भाजपच्या घटक पक्षांमध्ये नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या पक्षांना अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील काय? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात नाशिक मतदारसंघ शिंदे गटाचा असताना अजित पवार गटानेही त्यात दावा केल्याने शिंदे गटाची गैरसोय की भाजपची सोय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Ajit Pawar
Satyajeet Tambe Latest News : सत्यजित तांबे अडवणार विखेंच्या शिर्डी रेल्वेचा मार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com