Sharad Patil: धुळे शहरात यंदाच्या निवडणुकीत `एमआयएम`च्या मदतीला कोण?

Sharad Patil Dhule Election MIM Support: धुळे शहर मतदार संघात अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने यंदाही होणार मतविभागणी.
Sharad Patil, Farukh Shaikh & Anil Gote
Sharad Patil, Farukh Shaikh & Anil GoteSarkarnama
Published on
Updated on

MIM Vs Shivsena UBT: उत्तर महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत `एमआयएम` पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. यामध्ये धुळे शहर मतदार संघात मत विभागणीमुळे `एमआयएम`चे उमेदवार काठावर पास झाले होते.

महाराष्ट्रातील सर्वाधिक राजकीय स्पर्धा आणि गोंधळ असलेले शहर म्हणून धुळे शहराचे नाव घेतले जाते. या विधानसभा मतदारसंघासाठी यंदाही अनेक उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवार आहेत.

अपक्ष देखील तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरतात. त्यामुळे मत विभागणी होऊन अनपेक्षित उमेदवार विजयी होत असतो. यंदाच्या निवडणुकीतही तीच परंपरा कायम राहील का याची मोठी उत्सुकता आहे.

यंदा महाविकास आघाडी कडून ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात येणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात येथे भाजप उमेदवार देणार आहे. या दोन्ही प्रमुख आघाड्यांशिवाय `एमआयएम`चे विद्यमान आमदार फारुक शेख मैदानात आहेत

Sharad Patil, Farukh Shaikh & Anil Gote
Shivsena Politics: बडगुजर प्रकरणात अंबडचे पोलीसच अडकले संशयाच्या भोवऱ्यात?

अपक्ष म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांची देखील निवडणूक लढविण्याची तयारी आहे. या स्थितीत वंचित बहुजन आघाडी कडून देखील यंदा उमेदवार असेल. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा एका उमेदवाराची भर पडणार आहे.

त्यात या सर्व उमेदवारांमध्ये मतविभागणी होणार असल्याने कोणत्या उमेदवाराला त्याचा फटका बसतो. कोणत्या उमेदवाराला लॉटरी लागते. यावर राजकीय नेत्यांमध्ये पैजा लागल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत धुळे शहर मतदार संघात एमआयएम चे फारुक शेख हे दीड हजार मतांनी काठावर जिंकले होते. त्यांच्या विरोधात अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांना सुमारे ४३००० मते मिळून त्यांचा निसटता पराभव झाला. याव्यतिरिक्त माजी आमदार अनिल गोटे यांना ४१ हजार मते मिळाली होती.

Sharad Patil, Farukh Shaikh & Anil Gote
Narhari Zirwal Politics: झिरवाळ यांचा यु टर्न; आता मुख्यमंत्री नव्हे, राज्यपाल होण्याची इच्छा!

शिवसेना, भाजप युतीकडून शिवसेनेच्या हिलाल माळी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने या उमेदवाराकडे पाठ फिरवली. भाजपने त्यावेळी फारुक शेख यांना पडद्यामागून मदत केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. परिणामी शिवसेनेचे माळी हे चौथ्या क्रमांकावर राहिले.

यंदा धुळे शहर मतदार संघातून महायुतीतर्फे भाजपचे अनुप अग्रवाल यांचे इच्छुक उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि सुशील महाजन यांचे नाव चर्चेत आहे.

श्री पाटील हे इच्छुक म्हणून पहिल्या क्रमांकावर आहेत अशा स्थितीत शरद पाटील विरुद्ध भाजपचे अग्रवाल यांच्यात थेट लढत होऊ शकेल. `एमआयएम`चे आमदार फारुख शेख यांना गेल्या निवडणुकीत झालेली मदत यंदा होण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे अल्पसंख्याकांच्या पस्तीस हजार मतांवर त्यांची मदार असेल. त्यापुढे मते घेण्यासाठी त्यांना अन्य समाज घटकांची आणि राजकीय पक्षांची मदत अपेक्षित आहे. यातील कोणता पक्ष त्यांना उघड अथवा छुपे सहकार्य करतो, यावर धुळे शहर विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून असेल.

धुळे शहर हे राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत मानले जाते. सध्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या कालावधीत शहराचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूप घेऊन पुढे आले आहेत. गेली पाच वर्ष विरोधी पक्षांनी भाजप विरोधात नागरी प्रश्नांवर आंदोलन केले आहे. या पाच वर्षात `एमआयएम`चे फारुक शेख विरुद्ध भाजप असे आरोप प्रत्यारोप झाले.

त्याला विरोधकांनी नुरा कुस्ती असे संबोधले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत किती मत विभागणी होते आणि त्याचा कोणाला फटका बसतो यावर धुळे शहर विधानसभा मतदारसंघावरचे भवितव्य अवलंबून असेल. यामध्ये महाविकास आघाडीने अल्पसंख्यांक मतांना शेज लावली आहे त्यामुळे `एमआयएम`चे गणित बिघडणार. त्याचा फायदा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष किती उचलतो याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com