Shivsena Politics: बडगुजर प्रकरणात अंबडचे पोलीसच अडकले संशयाच्या भोवऱ्यात?

Shivsena Politics Ambad Police Investigation: दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला राजकीय फोडणी देण्यामागे कोण? याची जोरदार चर्चा.
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar Controversy News: नाशिक शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासाला पुन्हा एकदा राजकीय फोडणी मिळाली आहे. या फोडणीचा उग्र दर्पाने पोलिसांवरही आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला अडकवण्याच्या नादात पोलिसच अडचणीत येतात की काय?

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. यापूर्वी वादग्रस्त मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील सलीम कुत्ता यांच्याशी त्यांचे संबंध जोडण्यात आले होते.

नव्याने एक प्रकरण चर्चेत आले आहे. त्यात बडगुजर यांच्या मुलाला दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका गोळीबाराच्या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये राजकारण जोरदार तापले आहे. सोशल मीडियावर बडगुजर यांना टार्गेट करण्यात शिंदे गटाने कोणतीही कसर ठेवलेली नाही.

त्यामुळे बडगुजर प्रकरणात कोणते राजकीय नेते सक्रिय आहेत. हे स्पष्ट नसले तरीही अदृश्य शक्ती कोण? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष श्री बडगुजर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. याबाबत पक्षाच्या महिला आघाडीने जोरदार निदर्शने केली.

Sudhakar Badgujar
Bachchu Kadu Politics: चांदवड मध्ये बच्चू कडूंचा `प्रहार` काँग्रेसवर, भाजपची झाली सोय!

यावेळी महिला आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांनी अंबड पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचा तपास करणारे पोलीसच संशयाच्या भौऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. यातील फिर्यादी आणि ज्याच्यावर गोळीबार झाला. त्या माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावरच अनेक गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले आहे.

फिर्यादीवरच खंडणी वसुलीच्या गुन्ह्यांमुळे तो संशयाच्या भोवऱ्यात आहे. गोळीबार प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी श्री जाधव यांच्याशी संगणमत करून शहरात खंडणी वसूल करतात, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीने केला आहे.

बहुचर्चित एमडी ड्रग्स प्रकरणात देखील बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून काही संशयतांना तपासासाठी बोलविण्यात आले होते. त्यांच्याकडूनही वसुली केली गेली, असा आरोप या महिला नेत्यांनी केला. त्यात या पोलिसांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.

Sudhakar Badgujar
Narhari Zirwal Politics: झिरवाळ यांचा यु टर्न; आता मुख्यमंत्री नव्हे, राज्यपाल होण्याची इच्छा!

शिवसेनेचे बडगुजर यांना अडकवण्यासाठी लावलेल्या सापळ्यात अंबडचे पोलीसच अडकतात की काय अशी स्थिती आहे. सध्या शहरात या प्रकरणावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. याबाबत पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका केली होती.

या गोळीबाराच्या प्रकरणाला आता राजकीय रंग लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत श्री बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या सीमा हिरे विद्यमान आमदार आहेत.

भाजपच्या काही वादग्रस्त माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचा श्री बडगुजर यांना विरोध आहे. विरोध करणारे पूर्वश्रमीचे शिवसेनेत एकत्र काम करणारेच आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकारणाचा उग्र दर्प येऊ लागला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप आणि प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे बडगुजर हे आणखी काही दिवस चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com