Ajit Pawar News : 'त्या' विधानांवरून अजितदादांनी टोचले उद्धव ठाकरेंसह फडणवीसांचे कान...

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis News : अजित पवारांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar News : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती.

''महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत'' असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना ''मै फडतूस नही, काडतूस हू…झुकेगा नही, घुसेगा'' असे म्हटले होते. यानंतर ''फडतूस आणि काडतूस'' शब्दाचा वाद चांगलाच पेटला होता. यावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये शाब्दीक वाद पेटला होता. या प्रकरणावरुन आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'फडतूस आणि काडतूस' शब्दावरुन उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस याचे नाव न घेता टीका केली आहे.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी मागितली जाहीर माफी अन् कार्यकर्त्यालाही पक्षातून काढणार...

अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, ''काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावे तेच कळत नाही. कोणी फडतूस म्हणते, तर कोणी काडतूस म्हणते. कुणी काहीही म्हणते, अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Shashi Tharoor News : अदाणी प्रकरणात जेपीसी बाबत पवारांचे लॉजिक योग्यच; पण…थरुर म्हणाले...

तसचे संयुक्त महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली आहे. त्या रस्त्याने आपण जायला पाहिजे. वसंत दादा यांनी दाखवलेल्या तसेच वसंतदादा नाईक आणि शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवे. तो रस्ता आपल्या भल्याचा असल्याचे पवार म्हणाले. तो रस्ता आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.