PM Modi Nagpur Visit : PM मोदींच्या दौऱ्याआधी हिंदूंना एकीचा संदेश देणारे बॅनर्स; संघ अन् भाजपच्या मनात नेमकं काय? चर्चांना उधाण

RSS Headquarters Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.30) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार आहेत.
PM Modi Nagpur Visit
PM Modi Nagpur VisitSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 30 Mar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी (ता.30) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार आहेत.

तसंच यावेळी ते दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. आरएसएसचे शताब्दी वर्ष सुरु असल्यामुळे मोदींचा हा दौरा विशेष मानला जात आहे.

शिवाय या दौऱ्यात संपूर्ण वेळ सरसंघचालक मोहन भागवत हे मोदींसोबत असणार आहेत. तर नुकत्याच झालेल्या नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नागपुरात येत असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

PM Modi Nagpur Visit
Haribhau Bagade : Video : मोठी बातमी! राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले

तर दुसरीकडे भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवरती 'एक है तो सेफ है' हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोदींनी दिलेला नारा लिहिल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत लोकांनी भाजपला (BJP) भरभरून मतदान केलं. त्यानंतर राज्यात बहुमताचं सरकार स्थापन झालं आहे.

PM Modi Nagpur Visit
Manoj jarange News : मनोज जरांगेंनी घेतली संभाजीराजेंची बाजू ; म्हणाले, 'एकाकी नाहीत...'

त्यामुळे आता मोदी नागपुरात येत असताना बॅरनवर लिहिलेली 'एक है तो सेफ है' ची घोषणा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. या घोषणेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. संघ मुख्यालयातील भेट आणि हे बॅनर्स आणि हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर भाजप आणि संघ पुढील नेमकी काय रणनीती ठरवणार आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com