
Mumbai Political News : मुंबईत मराठी माणसांवर वाढलेल्या हल्ल्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप महायुतीच्या सत्ता कारभाराला दुर्दैवी म्हटले आहे.
"मराठीविरुद्ध अमराठी, असा वाद लावला जात असल्याच्या भाजपच्या आरोपावर, अंगलट आले की वाद लावले जातात. हे कोणी केले? हा प्रश्न करताना वाद अन् आगी लावण्याचे काम भाजप केला. या निवडणुकीत गुजराती, मारवाडी, जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसांच्या विरोधात उभं करण्याचे काम भाजपने केला", असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) मिळालेल्या बहुमतानंतर देखील सरकार स्थापनेला होत असलेल्या विलंबावरून डिवचलं. महाराष्ट्राची लूट करेल, याचा ट्रेलर आठदिवसांपासून सुरू आहे. सरकार स्थापनेबाबत एवढ्या अडचणी येत असतील, तर सरकार चालवणे कठीण आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रातील मुंबईमध्ये एकप्रकारे अराजक सुरू झालं आहे. भाजप विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसांवर वाढलेल्या हल्ल्यांवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप महायुतीवर हल्ला चढवला. हे हल्ले खपवून घेणार नाही. आम्ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेले शिवसैनिक आहोत.
बिल्डरांच्या घशात मुंबईत घातली जात आहे. पैशातून आलेली ही मस्ती आहे. विधानसभेत गैरमार्गाने आमचा पराभव केला आहे. परंतु लढण्याचे बळ तु्म्ही नष्ट करू शकलेले नाही. सत्ता नसतानाही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढत राहू. महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत म्हणाले, "मुंबईतील मराठी माणसांवर अनेक मार्गाने हल्ले होत आहेत. मुंबईतील मराठी माणसांची भाषा, व्यवसाय, उद्योग, व्यापर, नोकरी अशा अनेक मार्गांनी हल्ले सुरू झाले आहे. मुंबईमध्ये मराठी बोलू नका, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. गुजराती बोला, मारवाडी बोला, मुंबई भाजपने जिंकली आहे.
भाजपने जिंकली म्हणजे कोणी जिंकली? याचा खुलासा झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या आवतीभोवती जी माणसं आहेत, अमराठी, परप्रांतीय, उपरे, आणि शिवसेना म्हणून घेणारे, मराठी माणसाठी स्थापन झालेली शिवसेना, त्यातील डुप्लिकेट शिवसेना म्हणून घेणारा पक्ष हा सरकारमध्ये सामील आहे. मुंबई हे चित्र निर्माण झाले असून, ते गंभीर आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी गंभीर आहे".
"मुंबई मराठी माणसांच्या त्यागातून निर्माण झाली आहे. कष्टातून निर्माण झाली आहे. दहा फूट जमीन खोदली तरी, त्यात मराठी माणसाचं रक्त दिसेल. बलिदान दिसेल. हे आंदोलन भाषा, संस्कृती, माणसाच्या हक्कासाठी आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी बोलायचे नाही.
अशा धमक्या दिल्या जातात. मराठी खपवून घेतली जाणार नाही. अशा धमक्या दिल्या जातात. मराठी माणसाला ठार मारण्याच्या, उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जातात. या राज्याचे होणारे मुख्यमंत्री सहन करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे", असा देखील टोला संजय राऊत यांनी लगावला.
मंगलप्रभात लोढा यांनी गुजराती, मारवाडी आणि मराठी, असा वाद लावला जात असल्याचे ट्विट केले आहे. यावर संजय राऊत यांनी हा वाद कोणी लावला? आता अंगलट यायला लागल्यावर वाद लावला का? वाद अन् आगी लावण्याचे काम आपण केलेले आहे. या निवडणुकीमध्ये गुजराती, मारवाडी, जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसांच्या विरोधात उभं करण्याचे काम या लोकांनी केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
तसेच मुंबईवरती मराठी माणसांचा पगडा पुसून टाकून तिथं मराठी माणसाच्या दुश्मनाच्या हातामध्ये या राज्याची राजधानी सोपवण्याची भूमिका कोणी घेतली? हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून मुंबईत आम्ही काम करत आहोत.
मुंबईत तेव्हापासून सर्वभाषिक राहत होते. आम्ही अन्य भाषिकांना धमक्या दिल्या नाहीत. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाच राहील. बिल्डरांच्या घशात मुंबईत घातली जात आहे. पैशातून आलेली ही मस्ती आहे.
विधानसभेत गैरमार्गाने आमचा पराभव केला आहे. परंतु लढण्याचे बळ तु्म्ही नष्ट करू शकलेले नाही. सत्ता नसतानाही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढत राहू. महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.