NCP Politics: राष्ट्रवादीने शोधला महिला सुरक्षेवर अनोखा उपाय...ही मोहीम राबविणार!

Ambadas khaire politics, NCP's initiative for women I will protect myself बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा नाशिकमध्ये उपक्रम
Ambadas Khaire
Ambadas KhaireSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar: बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार झाला. या घटनेने सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. जनमानसात सरकार विरोधात संताप निर्माण झाला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवा शाखेने पुढाकार घेतला आहे.

या घटनेचे पडसाद राजकीय पक्षांकडून विविध स्वरूपात व्यक्त झाले. नाशिकमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भर पावसात निदर्शने केली. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी माफी मागावी. आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवक शाखेचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी देखील पुढाकार घेतला आहे. विरोधकांकडून राज्य शासनाला टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे.

श्री खैरे यांनी मात्र महिला आणि मुलींसाठी `माझी सुरक्षा मीच करणार` असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाचे पदाधिकारी शहरात शैक्षणिक संस्था आणि अन्य ठिकाणी महिलांशी संपर्क करून याबाबत जनजागरण करणार आहे. यामध्ये विविध कराटे प्रशिक्षकांकडून या महिलांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येईल.

Ambadas Khaire
Eknath Shinde politics: मालेगावच्या 'लाडक्या बहिणीं' शिंदेंना की आघाडीला देणार कौल?

महिला अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात महिला आणि मुलींनी स्वतःच आपले संरक्षण करावे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल त्या स्वयंपूर्ण होतील. आजच्या समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठेबरोबरच स्वयंपूर्णता आणि सक्षम व्यक्तिमत्व निर्माण करण्याची गरज आहे.

त्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यातून मुलींना व महिलांना स्वतःचे रक्षण स्वतःच करण्यासाठी आत्मनिर्भर करता येईल, असा दावा श्री खैरे यांनी केला आहे.

युवक काँग्रेस तर्फे महिला सशक्ती करण्याचा भाग म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात कार्यकर्ते महिलांची नोंदणी करतील. एक सप्टेंबर पासून हा प्रशिक्षण वर्ग सुरू होईल.

Ambadas Khaire
Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या संपर्कात ही शेतकरी संघटना; घेणार मोठा निर्णय..?

रोज संध्याकाळी सात ते आठ या वेळात महिलांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येईल. स्वतःची सुरक्षा कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन आणि प्रबोधन केले जाईल. शहराच्या सर्व भागात त्यासाठी सभागृह निश्चित करण्यात आले आहेत. अंबादास खैरे, मुकेश शेवाळे, विशाल डोके, व्यंकटेश जाधव, रामदास मेदगे हे पदाधिकारी ही मोहीम व नोंदणी यामध्ये काम करणार आहेत.

कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक अत्याचार आणि बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनींवर झालेला प्रकार याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. या संदर्भात विरोधी पक्षांकडून गेले काही दिवस सातत्याने आंदोलन होत आहे.

राज्याच्या सर्व शहरांमध्ये राज्य शासनाच्या विरोधात हे आंदोलन झाले आहे. त्यावर भाजपने राजकीय प्रत्युत्तर देत आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मात्र सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. त्यात महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने आत्मनिर्भर करण्यासाठी सकारात्मक उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे हा अनेकांना दिलासादायक ठरला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com