Dada Bhuse : प्रचंड बहुमत, तरी आयारामांच्या स्वागताला सज्ज! सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्वास डळमळीत?

Eknath Shinde Shivsena News : सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अद्यापही अन्य पक्षातील नेत्यांच्या हव्या आहेत कुबड्या?
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या बहुमतावर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका आणि संशय व्यक्त केला जात आहे. त्याची कारणे काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी मंत्री भुसे यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा होता.

Dada Bhuse
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंचा विश्वासू मंत्री अडचणीत? निवडीला न्यायालयात चॅलेंज

मात्र या संवादात मंत्री भुसे यांनी केलेल्या भाषणाने पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना संशय निर्माण व्हावा, अशी स्थिती झाली. मंत्री भुसे म्हणाले, अन्य पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात स्वागत केले जाईल. मात्र पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही.

Dada Bhuse
Sharad Pawar Politics: पदाधिकाऱ्यांना शरद पवार कोणता कानमंत्र देणार? उत्सुकता शिगेला

जुन्या कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल. पक्ष वाढीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण पक्ष देखील मोठा झाला पाहिजे. त्यामुळे चांगले लोक पक्षात येत असतील तर, आपण त्यांचे स्वागतच केले पाहिजे.

यावेळी नेहमीप्रमाणे ठोस राजकीय भूमिका घेण्याचे मंत्री भुसे यांनी टाळले. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि विविध घटना यावर त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. हे त्यांच्या स्वभावानुसारच होते. श्री भुसे नेहमीच राजकीय राजकीय भूमिका घेण्याचे टाळतात. त्याचीच पुनरावृत्ती या मेळाव्यात देखील झाली. कार्यकर्त्यांत देखील तो चर्चेचा विषय ठरला.

महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत आला आहे. दादा भुसे मंत्री झाले आहेत. मात्र तरीही आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी त्यांना अन्य पक्षातील आयात उमेदवारांचीच गरज आहे की काय, अशी स्थिती आहे. खुद्द मंत्री भुसे यांनी तसे संकेत दिले. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास आहे की नाही, असाही प्रश्न निर्माण होतो.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्ह्यात दादा भुसे मालेगाव बाह्य आणि सुहास कांदे नांदगाव हे दोन आमदार आहेत. आमदार कांदे सातत्याने मंत्री भुसे यांच्यापासून अंतर ठेवून राहतात. तसे वारंवार दिसून आले आहे. दुसरीकडे मंत्री भुसे यांनी गेली अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून नाशिकचा कारभार हाताळला आहे.

प्रत्येक निवडणुकीत अन्य पक्षातील पदाधिकारी आणि इच्छुकांना पदाचे कधी उमेदवारीचे गाजर दाखवत प्रवेश करण्यावर या पक्षाचा भर राहिला आहे. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेना एकनाथ शिंदे असो व नाशिकचे मंत्री भुसे यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव का अशी चर्चा आता होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com