

Ahmednagar News : समृद्धी महामार्गावरचा टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील टोलनाक्याच्या तोडफोडीच्या जुन्या घटना पुढे आणल्या. 'राजसाहेबामुळे ६५ टोलनाके फोडले गेले, आता माझ्यामुळे एक फुटला,' असे सांगून अमित यांनी आपला पवित्रा राज ठाकरेंसारखाच आक्रमक राहणार असल्याचेच सूचित केले आहे.
अमित ठाकरेंनी शुक्रवारी नगरमधील नियोजित कार्यक्रम संपलल्यानंतर शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. रात्री काही कामानिमित्त ते नाशिक निघाले होते. पण वाटेत समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर त्यांचे वाहन फास्ट टॅग असतानाही 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आले. यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने टोलची तोडफोड केली.
टोल तोडफोड प्रकरणाबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता, आपण काही कामानिमित्ताने नाशिकला गेलो होतो. पण समृद्धी महामार्गावर नाशिक एक्झिटवर माझ्या वाहनाला फास्ट टॅग असतानाही जवळपास 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आले. टोललाईनचा रॉड आडवा असल्याने वाहने खोळंबून राहिली.
यादरम्यान टोलवरील कर्मचारी, मॅनेजर यांचे वागणे ' अॅरोगंट' होतं. माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांनी फास्ट टॅग असल्याचे सांगितलं. पण त्यांचा काहीतरी टेक्निकल इस्श्यू होता. १५-२० मिनिटांनी आमचे वाहन सोडल्यानंतर नाशिकला हॉटेलवर पोहचल्यानंतर कळलं की, टोल फुटला!! असे, अमित ठाकरे स्मित करत सांगितले. 'साहेबांमुळे(राज ठाकरे) 65 टोल बंद झाले आहेत त्यात आता माझ्या मुळे एकाची भर पडली' अशी पुष्टी अमित ठाकरे यांनी केली. एकंदरीत राज ठाकरेंमुळे राज्यात प्रसिद्ध झालेला 'खळळ-खट्याक' हा शब्द अमित ठाकरेंच्या दौर्यात मनसे कार्यकर्त्यां पुन्हा चर्चेत आणला आहे.
दौऱ्याच्या निमित्ताने अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद आम्हांला मिळत असल्याचे सांगत अनेक युवक-युवती राजकारणात आमच्या सोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे दिसत असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांना लवकरच संघटनेत विविध पदांची जबाबदारी देण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहे. गरज पडल्यास आपण स्वतः प्रश्न सोडवण्यासाठी येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.