Anil Deshmukh News : अनिल देशमुखांचे होम ग्राऊंडवर तब्बल 21 महिन्यांनी पाऊल; नागपुरात जाताच झाले भावूक

Nagpur : ढोल-ताशांच्या गजरात देशमुखांचं नागपूर विमानतळावर स्वागत
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

NCP News : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली जय्यत तयारी पाहून देशमुखही भारावले.

अनिल देशमुख हे (Anil Deshmukh) तब्बल 21 महिन्यांनंतर आज नागपुरात दाखल झाले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात देशमुखांचं नागपूर विमानतळावर स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून देशमुखही भावूक झालेले यावेळी पाहायला मिळाले.

Anil Deshmukh
Ajit Pawar : भुमरेंच्या दारू दुकानांचा अजित पवारांकडूनही उल्लेख, म्हणाले एकनाथ महाराजांना काय वाटेल ?

देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना ईडी आणि सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तब्बल 14 महिन्यानंतर जामीन मिळाला. मात्र, मुंबईतून तीन महिने बाहेर जाता येणार नाही, अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली होती.

त्यानंतर देशमुखांनी मुंबई बाहेर जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ते आज नागपूरला आपल्या मतदारसंघात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात 'टायगर इज बॅक'चे पोस्टर झळकवले.

Anil Deshmukh
Rajesh Tope News : त्यांना म्हणायचे होते `संत` एकनाथ, पण घोळ झाला..

यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले, ''21 महिन्यानंतर मी नागपुरात आलो आहे. त्यामुळे मला नागपुरात येऊन आनंद झाला. मला खोट्या गुन्ह्यामध्ये आत टाकण्यात आले होते. पण आता स्वगृही परतल्यामुळे आनंद झाला आहे'', असं म्हणत देशमुख भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Anil Deshmukh
Narayan Rane : पत्रकाराच्या मृत्यूवर नारायण राणे म्हणतात, "मी काय तेवढंच बघू का..?

दरम्यान, 21 महिने अनिल देशमुख हे आपल्या मतदारसंघापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांचे कामं रखडले होते. मात्र, आता ते मतदारसंघात दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com