

Ashok Kharat : आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप नाशिकच्या अशोक खरातवर आहे. लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यात अशोक खरात १८ मार्चपासून तुरुंगात आहे.
लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरातला आता स्वतःच्या भविष्याबाबत अधिकच चिंता वाटू लागली आहे. गेल्या शंभरहुन अधिक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या खरातला आता पत्नी कल्पना खरात व मुलगा हर्षवर्धनची चिंता सतावू लागली असल्याची माहिती पोलिसांनी सूत्रांनी दिली.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही गेल्या अडीच महिन्यांपासून फरार आहे. शिर्डी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच कल्पना खरात जी फरार झाली तेव्हापासून आजूनही पोलिस तिला शोधू शकलेले नाही. ती कुठे असावी, असा प्रश्न खरातला विचारला असता मलाच तिची अन् मुलगा हर्षवर्धनची चिंता वाटत असल्याचे तो म्हणाला, मात्र, पत्नीपेक्षा मुलाची चिंता खरातला अधिक सतावत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारातील १६.५० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत कल्पना खरातला नाशिकरोड न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, शिर्डी येथील दुसऱ्या गुन्ह्यात आजूनही तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
शिर्डी येथील भूखंड बळकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतर कल्पना खरात हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात तिला जामिन मिळतो की काय होते यावरच कल्पना खरातचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
दुसरीकडे अशोक खरातवर नाशिकमध्ये दाखल असलेल्या १४ गुन्ह्यांपैकी ९ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. दाखल दोषारोपपत्रात खरातची महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठीची मोडस ऑपरेंडी कथन करण्यात आली असून, खरात प्रकरणाच्या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.
आपल्या विविध समस्यांवर इलाज शोधायला गेलेल्या महिलांना भोंदू खरातने कथित शक्तीचा वापर करत आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांचे लैंगिक शोषण भोंदू खरातने केले. दाखल दोषारोपपत्रात पोलिसांनी डिजिटल पुराव्यांचा उल्लेख केला आहे. खरातच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ऑफिसमधून अनेक पुरावे एसआयटीनेया आधीच जप्त केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.