

Nashik Ashok Kharat Case : महिलांवर लैगिंक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे विविध कारनामे एसआयटीच्या तपासात आजवर समोर आले आहे. त्यातीलच त्याचा एक कारनामा म्हणजे तो बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे रानटी चिंचोके आणायचा आणि एका व्यावसायिकाकडून तो त्याचे आकर्षक खडे बनवायचा. ते खडे मंत्र मारुन तो भाविकांना लाखो रुपयांना विकायचा व त्यांची आर्थिक लूट करायचा.
खरातने अनेक लोकांची अशाप्रकारे फसवणूक केली. खरातने एका व्यापाऱ्यास त्याचा व्यापार वाढावा, यासाठी हा खडा दिला होता. त्या बदल्यात लाखो रुपये त्याने उकळले होते. त्यामुळे एसआयटीने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं होतं. एसआयटीच्या तपासात खरातला या चिंचोक्यांपासून आकर्षक खडे तयार करून देणाऱ्या व्यावसायिकाचा शोध लागला आहे.
बाजारात कवडीमोल किमतीत खरेदी केलेले चिंचोके अशोक खरात नाशिकरोडच्या एका व्यावसायिकाला देत होता. महेश कलंत्री असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. मग कलंत्री त्या चिंचोक्यांपासून खरातला आकर्षक खडे बनवून देत जे अत्यंत महागडे भासत. हेच खडे खरात आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अगदी हजारो-लाखो रुपयांना विकत असल्याचे ‘एसआयटी’च्या तपासातून समोर आले आहे.
आता या प्रकरणात एसआयटीकडून व्यावसायिक महेश कलंत्री याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. कलंत्री याने बनवून दिलेले खडे अशोक खरात अगदी १० ते १५ हजारांपासून दोन ते अडीच लाखांना विकायचा. त्यामुळे हा व्यावसायिक एसआयटीच्या रडारवर आला आहे. (Nashik Crime)
आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना भोंदू खरात आपण दैवी अवतार असल्याचे भासवत असे तसेच भविष्यातील दुर्देवी घटनांची भीती दाखवून भोंदू खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. त्याचप्रमाणे अंकशास्त्रावरून भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरातने अनेकांना लाखो रुपयांना गंडवलं आहे. त्यातून त्याने कोट्यावधींची माया जमवली आहे. त्याच्या गैरमार्गाने कमवलेल्या संपत्तीचा तपास आता ईडी करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.