Ashok Kharat : शंभर रूपये किलोने आणायचा, एक चिंचोका 1 लाखाला विकायचा... अशोक खरातने भाविकांना कसं लुटलं?

Ashok Kharat scam : स्वयंघोषित ज्योतिषी भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे समोर येत असून, तपासातून धक्कादायक खुलासे समोर येत आहे. महिलांवर अत्याचार करण्यासह भाविकांची तो आर्थिक लूटक करत असल्याचे समोर आले आहे.
Ashok Kharat
Ashok KharatSarkarnma
Published on
Updated on

Nashik News : महिलांवर अत्याचार करणारा भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे समोर येत असून, त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ज्याद्वारे तो लोकांना वेड्यात काढून त्यांची आर्थिक लूट करत असे व पैसा कमवत असे. आपल्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भाविकांना तो चांगलेच लूटून घेत.

खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करायचा. आपल्याकडील कथित शक्तीचा वापर करत तो लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत असे. तो बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. ते चिंचोके कापडाने घासून स्वच्छ केल्यानंतर ते खड्यासारखे चमकायचे, हे चिंचोके खरात ऑफिसमध्ये येणाऱ्यांना मंत्र मारुन भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत विकायचा. खरातच्या निकटवर्तीयांच्या FIR मध्ये याचा उल्लेख आहे.

त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके 'दैवी शक्तीचे' असल्याचे सांगत खरातने त्यातील एक-एक चिंचोका तब्बल एक लाख रुपयांना विकलाचे तपासून समोर आलेल्या माहितीतून उघड झाले आहे. नाशिकरोड येथील एक व्यक्ती हे नकली खडे खरातला आणून देत असे.

Ashok Kharat
Nashik Crime : खरात बाबाच्या लीला संपत नाही तोच नाशिकमध्ये बडे बाबाची एन्ट्री, अंनिसची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

यासह खरात पाच इंच जाड व वेगवेगळ्या लांबीचे प्लॅस्टिकचा साप, वाघाची कातडी खरेदी करायचा. या साहित्यांद्वारे भाविकांना घाबरवायचा. त्यांच्याकडून पैशांची लूट करायचा. एकप्रकारे यातून खरात लोकांच्या भावनेशी खेळत होता.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

दरम्यान, यापूर्वी खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्च २०२६ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित भोंदू अशोककुमार खरातविरुद्ध बलात्कारासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. आता त्याच्याविरोधात आणखी दोन महिला पुढे आल्या असून त्यांनीही तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांत आणखी दोन गुन्हे खरातविरोधात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat News: खरातचा नवा कारनामा समोर! कंबरेला बंदूक लावून दर शनिवारी, रविवारी कुठे जात होता...

आज भोंदू बाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची देखील शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com