Ashok Kharat : तेच पाणी आणि तेच पेढे, SIT'ला अजून काही सापडलं नाही का? अशोक खरातच्या वकीलांचा कोर्टात संताप..

Ashok Kharat case update : अशोक खरात याचा पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन न्यायालयाने निर्णय दिला.
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants PermissionSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला नाशिक न्यायालयाने शुक्रवारी (दि. २४) पुन्हा दणका दिला. न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात खरातला विशेष तपास पथक अर्थात SIT ने पुन्हा अटक केली. खरातला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

नाशिक पोलिसांनी खरातला १८ मार्च २०२६ रोजी अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात एकामागून एक अत्याचार व फसवणुकीचे गुन्हे दाखल होत गेले. याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्यात आलेली असून एकुण ९ गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात एका महिलेला गुंगीचे द्रव्य पाजून, पेढे आणि इतर पदार्थ खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा खरातवर दाखल आहे. याच गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी SIT ने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok kharat land scam : 4 कोटींची जमीन 58 लाखांत लाटली; अशोक खरातचा नवा कारनामा उघड

सरकारी वकीलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले की, महिला अत्याचार प्रकरणातील हा महत्त्वाचा गुन्हा आहे. आरोपी खरात हा पीडित महिलेला माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून घाबरवित होता. पीडितेला तिच्या वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवित होता. पीडितेला पाणी व पेढे देत होता. आणखी त्याने काय-काय केले आहे? याचा शोध घ्यावा लागणार असल्याने पोलीस कोठडी मिळण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली.

दरम्यान यावर आरोपी खरातच्या वकिलांनी नेहमीप्रमाणे पोलिस कोठडीला कडाडून विरोध केला. त्यांनी म्हटलं की, ही सहावी केस आहे. या केसमध्ये देखील तेच पाणी, तेच पेढे आहेत. एसआयटीला तपासात अजून काही सापडलं नाही का? एसआयटीला आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद आहे हेच कळत नाही, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

तसेच आर्थिक विषय फिर्यादीत नाहीत. त्यामुळे तो निर्माण करायचा आहे का? असा सवाल उपस्थित करत पोलीस कोठडीची गरज नाही. दरवेळी तीच कारणे सांगत पोलीस कोठडी वाढवून मागत आहे असा युक्तीवाद खरातच्या वकिलांनी केला.

Ashok Kharat Life Threat? SIT in Action Mode, Court Grants Permission
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात चाकणकरानंतर दुसरी विकेट पडली; 15000 पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा नेत्यानं दिला राजीनामा

दरम्यान त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात यावर स्पष्टीकरण दिलं. प्रत्येक गुन्ह्यात पीडित महिला वेगळी आहे. त्यामुळे तपास झाला पाहिजे. त्यासाठी आरोपीचा प्रत्यक्ष ताबा मिळायला हवा असे मत मांडत सलग सहाव्या गुन्ह्यात एसआयटीकडून अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर अशोक खरात याला न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com