

Nashik News : वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन अशोक खरात यांच्या उद्योगामुळे मीरगाव येथील ग्रामस्थ संतप्त आहेत. लवकरच ग्रामसभा घेऊन त्याच्या विरोधात ठराव केला जाणार आहे. यानिमित्ताने कॅप्टन खरात याच्या अनेक लीला उघड होत आहेत.
वादग्रस्त तांत्रिक अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो. नेव्ही मध्ये कॅप्टन असल्याचा दावा त्याचे अनुयायी करतात. त्यामुळे याच टोपण नावाने तो अनेक राजकीय नेत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कॅप्टन असा उल्लेख करीत परिचय करून दिला जातो. त्यामुळे अनेकांना तो उच्चशिक्षित आणि नौदलात अधिकारी कार्यरत असल्याचा भ्रम होतो. त्याचे अंकशास्त्राचे ज्ञान त्याला अनुकूल ठरते.
याच कारणामुळे अनेक राजकीय नेते आणि मंत्री त्याच्या संपर्कात आले आहेत. जिल्ह्यातील एक माजी मंत्री देखील त्याला वश झाला होता असे पुढे आले आहे. संबंधित माजीमंत्राच्या पत्नीने खरातला चांगलाच दम भरल्याने त्याने त्यातून अंग काढून घेतले.
वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन खरात यांनी अनेकांना फसविण्याचे उघड झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही त्याची झळ बसली आहे. मात्र कॅप्टन खरात याने सगळ्यात आधी जन्मदात्यालाच गंडवल्याचे कळते.
शाळेत शिकत असताना वडिलांनी त्याला चार हजार रुपये दिले होते. घराची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. चार हजार रुपये देऊन सिन्नर येथून पत्रे आणण्यासाठी त्याला पाठवले होते.
चार हजार रुपये घेतल्यावर अशोक खरात परांगदा झाला. त्याने कहांडळवाडी या आपल्या गावातील शाळेलाही रामराम ठोकला. इयत्ता आठवीतच त्याने शिक्षण सोडले. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही उच्च शिक्षणाची पदवी नाही, असा खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.
अशोक खरात चार हजार रुपये घेऊन पत्रे आणण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो काही दिवस खलाशी म्हणून काम करीत होता. तो चार वर्षांनी पत्रे घेऊन परत आला, अशी आठवण त्याच्या गावातील निकटवर्ती यांनी दिली. (Nashik News)
सध्या कॅप्टन खरात यांनी अनेकांना गंडा घातला आहे. त्यात अनेक उच्चपदस्थ अधिकारी मंत्री आणि शिक्षित महिला आहेत. मात्र सर्वात आधी त्याने आपल्या जन्मदात्यालाही गंडा घातला होता हे या निमित्ताने पुढे आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.