

Ashok Kharat Case: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात प्रकरणात पोलीस एका महत्वाच्या व्यक्तीच्या शोधात आहेत. हा व्यक्ती सध्या फरार झाला असून तो याप्रकरणातील महत्वाचा दुवा आहे. खरातचा तो अत्यंत निकटवर्तीय असून जर या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर खरातनं आजपर्यंत जे काही आर्थिक व्यवहार केलेत तसंच ज्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत, हे सर्वकाही उघड होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येत आहे. या तपासानं आता वेग घेतला असून खरातचा पीए रमेश हिंगे फरार हा यातला महत्वाचा दुवा असून SIT कडून त्याची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. हिंगे हा खरातचा अत्यंत निकटवर्तीय असल्याची माहिती मिळते आहे. अशोक खरातचे सर्वप्रकारचे आर्थिक व्यवहार आणि संपर्क व्यवस्थापनात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याची शक्यता तपास पथकानं व्यक्त केली आहे.
दरम्यान, खरातच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा म्हणून हिंगेवर तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे. अनेक व्यवहार आणि भेटीगाठींची माहिती हिंगेकडे असण्याची शक्यता आहे. या हिंगेला ताब्यात घेण्यासाठी SITकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु असून त्याचा शोधही सुरू आहे. हिंगे जर एसआयटीच्या हाती लागला तर तपासाला मोठी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या अशोक खरातच्या अडचणी वाढणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.