

Dhule Politics : सध्या राज्यभरात नाशिकच्या वासनांध कॅप्टन अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची चर्चा आहे. त्याने भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेक महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचेही समोर आले आहे. या भोंदू खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात काही फोटो खरे असले तरी काही फोटो हे बनावट एआयद्वारे किंवा मॉर्फ केलेले आढळतात. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात संभ्रम निर्माण होतो.
अशाच प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर करून भाजप नेते व राज्याचे पणन, राजशिष्टाचारमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचा भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा एक बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. तांत्रिक तपासणीनंतर हा फोटो पूर्णपणे बनावट व मॉर्फ केलेला असल्याचे सिद्ध झाले.
गेल्या काही दिवसांपासून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यात पणनमंत्री रावल यांच्यासोबत नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात असल्याचे दाखविले होते. हा फोटो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फिर्यादीला मिळाला. या फोटोची सत्यता पडताळली असता, मूळ फोटोत छेडछाड करून तो मॉर्फ केला गेला असल्याचे निष्पन्न झाले. यात जाणीवपूर्वी मंत्री रावल यांची जनमानसात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने हा खोटा फोटो पसरवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान फोटो प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध धुळे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी त्यांच्याकडील अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने तपास केला असता, संबंधित फोटो तांत्रिकदृष्ट्या बनावट असल्याचे कायदेशीर सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे फोटो मॉर्फ करुन अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी अशाप्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह मेसेज, फोटो, व्हीडीओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत. सोशल मीडियावरून राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तींचे मॉर्फ केलेले फोटो किंवा चुकीची माहितीही प्रसारित करू नये. असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.