Ashok Kharat : जमीन घेतली अन् तासाभरात खरातच्या संस्थानला दान केली : तेवढ्या वेळात भाव 8 लाखांनी वाढला; गौडबंगाल काय? आप नेत्याची चाकणकरांकडे विचारणा

Ashok Kharat land scam : खरातने पत्नी, मुलगी व नातेवाईकांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचे आता समोर आले आहे. ही माया जमावताना कागदोपत्री पैशांचा खेळ केल्याचा आरोप आप नेत्याने केला आहे.
Ashok Kharat land scam
Ashok Kharat land scamSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भोंदूबाबा अशोक खरातने भोंदूगिरीच्या जोरावर कोट्यावधी रुपायांची माया गोळा केल्याची बाब समोर येत आहे. वेगवेगळ्या मार्गांनी खरातने ही माया जमवल्याचे बोलले जात आहे. भोंदूगिरीसह तो जमीनीच्या-खरेदी विक्रीचे व्यवहारही करत. आतापर्यंत त्याच्या मालमत्तेचे ६० हुन अधिक सातबारे समोर आले आहेत. आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खरातचा असाच एक व्यवहार समोर आणला आहे.

विजय कुंभार यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, नरेंद्र नारायण हेटे नावाच्या एका गृहस्थांनी 2019 साली पाच एकर जागा विकत घेतली. 16 लाख बाजार भाव दाखवलेली ही जमीन त्यांनी 24 लाखाला विकत घेतली. आणि त्याच दिवशी अवघ्या दीड दोन तासात ही जमीन त्यांनी खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टला दान दिली. परंतु दान देताना या जमिनीची किंमत 32 लाख दाखवण्यात आली. अवघ्या दीड दोन तासात 8 लाखाचा फरक कसा पडला? असं का करण्यात आलं असा सवाल कुंभारकर यांनी उपस्थित केला आहे.

कदाचित रूपाली चाकणकर याच याबाबत सांगू शकतील. कारण त्या या ट्रस्टचा सदस्य आहेत. असही कुंभारकर यांनी म्हटलं आहे. कुंभारकर यांनी या जमीनी खरेदीचे खरेदी खताचे फोटोही एक्सवर पोस्ट केले आहेत. ४ मे २०१९ रोजी झालेल्या मिरगावातील जमिन व्यवहाराच्या खरेदी खताचे व दानपत्राचे फोटो कुंभारकरांनी शेअर केले आहेत.

Ashok Kharat land scam
Ashok Kharat: खरात प्रकरणात 'या' महत्वाच्या दुव्याच्या शोधात पोलीस! अनेक व्यवहार, भेटीगाठींची माहिती उघड होण्याची शक्यता

३२ लाख रूपये किमतीची जमिन दान मिळणे हा भोंदू बाबा अशोक खरातच्या अब्जावधी रुपयांच्या काळ्या संपत्तीतला एका थेंबाएवढा सुद्धा भाग नाही. परंतु कागदोपत्री पैशांचा खेळ कसा केला जातो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचं कुंभारकर यांनी म्हटलं आहे.

हे धाडस कुठून येतं?

तसेच नाशिकमध्येही खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिचं आणि उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव पाथर्डी शिवारातील एक एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यात एकत्रित दिसत आहे. त्याध्ये अशोक खरात यांची मुलगी तृप्तबाला खरात आणि अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नी प्रिती भांडे पाटील यांची नावे सामायिक (संयुक्त) मालकीदार म्हणून नोंदवलेली आहेत.

Ashok Kharat land scam
Ashok Kharat case : चाकणकरांना पुण्यातील 'या' तीन रणरागिनींच्या तोफेमुळेच सोडावे लागले महिला आयोगाचे अध्यक्षपद; आक्रमक पवित्र्यामुळे सरकार झुकले!

या व्यवहारासंदर्भातही कुंभारकर यांनी एक्सपोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील ‘एपस्टीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्या पत्नीबरोबर जमिनीमध्ये भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती हा राज्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पदावर कार्यरत आहे.

विशेष म्हणजे, त्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर अनेक कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स आणि एक स्टार्टअप देखील आहे. साधारणतः कोणताही सरकारी अधिकारी आपल्या कुटुंबीयांच्या नावे अशा प्रकारचे धंदे करताना दहा वेळा विचार करतो. पण इथे तर सरळ सरळ भागीदारी दिसून येते.

हे धाडस कुठून येतं? उत्तर स्पष्ट आहे — राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांचा पाठिंबा. आणि योगायोग असा की, दोघेही अशोक खरात याचे ‘भक्त’ आहेत. असे आरोप कुंभारकर यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com