Ashok Kharat case : चाकणकरांना पुण्यातील 'या' तीन रणरागिनींच्या तोफेमुळेच सोडावे लागले महिला आयोगाचे अध्यक्षपद; आक्रमक पवित्र्यामुळे सरकार झुकले!

Maharashtra political pressure News : भोंदूबाबा अशोक खरात यांच्या काळ्या कारनाम्यामुळे राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. खरात यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आहेत.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात यांच्या काळ्या कारनाम्यामुळे राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. खरात यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आता विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने सोमवारपासून विरोधक या प्रश्नावरून राज्य सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यातच रुपाली चाकणकर यांचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, चाकणकर यांच्या कार्यशैलीवर समाजमाध्यम आणि आंदोलनाच्या माध्यमातून टीका करण्याचे काम पुण्यातील तीन महिलांनी सातत्याने केले. पुण्यातील या तीन रणरागिनींच्या तोफेमुळेच राजीनामा द्यावा लागला आहे.

भोंदूबाबा अशोक खरात यांच्या काळे कारनामे समोर आल्यानंतर या तीन महिलांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे सर्व विरोधी पक्षाने त्यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच राज्य सरकारवरील दबाव वाढत गेला. दिवसागणीस त्यांचे फोटो माध्यमासमोर येत असल्याने सत्ताधारी महायुतीची अडचण झाली. त्यांच्या आक्रमक आंदोलनाला चाकणकर प्रत्युत्तर देत राहिल्या. मात्र, त्यांचा आवाज या तीन महिलांच्या विरोधापुढे कमी पडला.

Rupali Chakankar
Maharashtra News Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या जाणून घ्या एका क्लिकवर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर समाजमाध्यम आणि आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगिता तिवारी यांनी आक्रमकपणे बाजू लावून धरली.

Rupali Chakankar
Ashok Kharat Crime: खरात 'कनेक्शन' अंगलट,राजीनाम्यासाठी दबाव; चाकणकरांनी घेतली थेट 'डीजीपी' दातेंची भेट, दिली 'ही' मोठी अपडेट

या तीनही महिला नेत्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन मीडियासमोर मोठा विरोध केला. रुपाली पाटील, सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आरोपाला चाकणकर यांना प्रत्युत्तर देता आले नाही. नाशिकमधील भाेंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक छळाचे प्रकरण उघड झाल्यानंतर या तीन रणरागिनींनी आवाज उठवला.

Rupali Chakankar
Ashok Kharat Case: '...म्हणून अशोक खरातचा 'या' तारखेला एन्काऊंटर होऊ शकतो!' महिला नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

या तीन महिलांनी पुरावे म्हणून फोटो व व्हिडिओ समोर आणले. त्यांनी केलेले आरोप आणि टीकेमुळे राज्यात चर्चा झाली. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्यात पुण्यातील तीन महिलांचा आक्रमकपणा कारणीभूत ठरला आहे. या तीन महिलांनी एकामागे एक अनेक आरोप केले. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावा लागला. चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतरही या तीन महिलांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे या तीन महिलांच्या आंदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Rupali Chakankar
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांनी स्वत:चे बोट कापले, सुषमा अंधारेंनी दाखवले भयंकर फोटो ; अटक करुन नार्को टेस्टची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com