Ashok Kharat : 'घुसला घराघरात..', 'नागोबा डोलवीत होता..'; अशोक खरातच्या भोंदूगिरीवरील गाण्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Songs exposing Nashik fake baba Ashok Kharat and alleged exploitation of women are going viral across social media platforms : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोंदूगिरीवर मार्मिक टिप्पणी करणारे गाणी तयार करण्यात आली असून, ती समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
Nashik fake baba Ashok Kharat
Nashik fake baba Ashok Kharatsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अशोक खरात प्रकरणावर आधारित गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

  2. या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळत असून रिल्स आणि शॉर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

  3. याच प्रकरणावर काल्पनिक चित्रपटाचीही घोषणा यूट्यूबवर करण्यात आली आहे.

Viral songs on fake baba Ashok Kharat : गाणी ही नेहमीच अभिव्यक्तिचं सशक्त माध्यम राहिली आहेत. अभंग, भारुड, ओव्या अशा पारंपरिक रचना, असो वा शेतकरी गीतं, कोळी गीतं वा भीम गीतं! सामाजिक परिस्थितीचा संदर्भ त्यात हमखास येतो. सध्या चर्चेत असणाऱ्या भोंदूबाबा खरात प्रकरणावर देखील एक गाणे आले आहे. पूर्ण गाण्याला सुमारे साठ हजार व्हयूज आहेत, याशिवाय अनेक रिल्स आणि शॉर्ट्समध्ये या गाण्याचा वापर होतोय. एवढेच नव्हे, तर अशोक खरात प्रकरणावर काल्पनिक चित्रपटाची घोषणा देखील एकाने यूट्यूबवर करून टाकली आहे. अशोक खरात याची ही गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन/क्रांती. सामाजिक चळवळींची गाणी, असे डिस्क्रिप्शन असणाऱ्या ‘@Kभाऊ-Porlekar’ नावाच्या अकाऊंटवरुन “घुसला घराघरात भोंदूबाबा अशोक खरात” या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा “भोंदूबाबा अशोक खरात नागोबा डोलवत होता” हे नवीन गाणे नुकतेच पोस्ट करण्यात आले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून खरात प्रकरणावर विडंबनपर गाणी तयार केली आहेत.

पहिल्या गाण्यात खरात प्रकरणी छापून आलेल्या बातम्यांचा दाखला दिला आहे. राजकीय वरदहस्तामुळेच घुसला घराघरात भोंदूबाबा अशोक खरात, ही पहिलीच ओळ लक्ष वेधून घेते. “अंधभक्तांना नाही तोटा, विज्ञानाला देऊन फाटा, एकेक धूर्त नेता मोठा” असे म्हणत गीतकाराने संबंधित भक्तांवर देखील कोरडे ओढले आहेत.

Nashik fake baba Ashok Kharat
Ashok Kharat : अशोक खरातसोबतच्या व्हायरल व्हिडिओंनी महिलांना टाकलं नैराश्यात, 8 ते 9 महिलांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव..

आक्षेपार्ह टाळून निवडक छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील त्यांनी वापरले आहेत. याच गाण्याचा दुसरा भाग देखील असाच विडंबनपर आहे. मोठा नाग वश करत असल्याचा दावा भोंदूबाबा खरात करत असे, त्याबद्दल गीतकाराने भाष्य केले आहे.

एआय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून अशोक खरातचे नाग डोलवण्याचे दावे कसे केले जात ते दाखवून, “आमदार-खासदारांच्या गाठीभेटी- खासगी बैठका सत्ता संपत्तीसाठी” असा टोला लगावला आहे. तथाकथित ओशनो जल, चिंचोक्याची रत्ने यावर देखील गाण्यातून भाष्य केले आहे.

एका काल्पनिक चित्रपटाचे पोस्टर

याच विडंबनपर गाण्यावर आधारित एका काल्पनिक चित्रपटाचे पोस्टर @RamChakrupeReddy नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहे. हे पोस्टर देखील एआय निर्मित आहे. 'एक खरात अनेक घरात', असं फिल्मला नाव दिलं आहे. या फिल्मची टॅग लाइन राजाश्रय, सेक्सकांड आणि भोंदूगिरी,अशी पोस्टरवर दिली आहे. तसंच फिल्मची निर्मिती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिकेत भोंदू अशोक खरात यालाच दाखवण्यात आलं आहे. ही फिल्म 18 मार्चपासून महाराष्ट्रात रिलिज झाल्याचं पोस्टरवर लिहिलं आहे.

कोट्यवधींची उलाढाल, 12 गुन्हे दाखल

भोंदू बाबा अशोक खरात याच्या साम्राज्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी होत आहे. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिचे आर्थिक व्यवहार मोठे होते. जगदंब अन् समता नागरी पतसंस्थांमध्ये त्याची खाती आढळली आहेत. त्याच्या शेकडो भक्तांच्या खाताला वारसदार म्हणून त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत.

अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल असून, रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यामुळे सर्व व्यवहारांच्या चौकशी ईडी मार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत.

Nashik fake baba Ashok Kharat
Ashok Kharat Case : तुळजापुरात पाऊल ठेवताच सुनील तटकरेंचे भोंदूबाबा खरात प्रकरणी मोठे वक्तव्य; थेट म्हणाले,'विकृत मनोवृत्तीला ठेचून....'

FAQs :

1. अशोक खरात प्रकरणावर काय नवीन घडलं आहे?
या प्रकरणावर आधारित गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

2. हे गाणे कुठे ट्रेंड होत आहे?
रिल्स, शॉर्ट्स आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.

3. या गाण्याला किती व्ह्यूज मिळाले आहेत?
गाण्याला सुमारे साठ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

4. चित्रपटाबाबत काय माहिती आहे?
या प्रकरणावर आधारित काल्पनिक चित्रपटाची घोषणा यूट्यूबवर करण्यात आली आहे.

5. लोकांचा प्रतिसाद कसा आहे?
लोक मोठ्या प्रमाणात या गाण्याचा वापर करत असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com