

Nashik Court News: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी म्हणून मिरवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात समोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. महिलांवर अत्याचार, नरबळी, भक्तांच्या श्रद्धेचा घेतलेल्या गैरफायद्यातून जमवलेली हजारो कोटींची मालमत्ता याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी (ता.23) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात खरात मोजून पाच वाक्य बोलल्याची माहिती समोर येत आहे.
कॅप्टन अशोक खरातने पस्तीस वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध पाजून अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी (ता.18 मार्च) खरातला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपली.त्याचमुळे खरात यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर अशोक खरात न्यायालयात मान खाली घालून उभा असल्याचं दिसून आलं. तो स्वत:च्या हाताच्या बोटांकडे निरखून पाहत होता. यावेळी पोलिस कोठडी सुनावण्याआधी मोठी घडामोड पाहायला मिळाली.
न्यायाधीशांनी पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काहो...तुम्हाला काही बोलायचं आहे का अशी विचारणा केली. यावर खरातनं मला साप, वाघ याविषयी काही माहिती नसल्याचं सांगितलं.आपण हे पहिल्यांदाच ऐकत असल्याचंही खरातनं न्यायाधीशांसमोर म्हटलं. तसेच मी कधीतरी मंदिरात कधीतरी जात होतो. त्यावेळी मंदिरात 100 च्या आसपास लोक उपस्थित असायचे.
पण आपण शिवरात्र-श्रावणी सोमवारी याप्रसंगीच मंदिरात जात होतो. यावेळी खरातनं न्यायाधीशांना 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी चौकशीवेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचंही सांगितलं.
अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास हजर करण्यात आले होते. न्यायालयात पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या तपासाची संपूर्ण माहिती दिली. तसेच अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासह पुढील तपासासाठी सरकारी वकिलांमार्फत पोलिसांनी खरातच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने खरातला 29 मार्चपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.