Ashok Kharat : अशोक खरातला गुपचूप नाशिकमधून हलवले, ईडीने ताबा घेताच मोठा निर्णय, आता तपासाचे नवे केंद्र...

Ashok Kharat ED : मागील 69 दिवसांपासून नाशिकमधील पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातचा ताबा आता ईडीकडे असणार आहे. त्याला नाशिकमधून गुपचूप शिफ्ट करण्यात आले आहे.
Ashok Kharat shifted to Mumbai as investigating agencies intensify the ongoing probe.
Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News : वादग्रस्त भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधातील 11 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. आता या संदर्भात नऊ गुन्ह्यांतील आरोपपत्र दाखल करण्याची प्रतीक्षा आहे. तो 69 दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत होता.

दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कॅप्टन अशोक खरातचा ताबा ईडीला दिला होता. ईडीकडून कोपरगाव आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये 92 बेनामी खात्यांचा तपास सुरू आहे. मध्ये 70 कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांची तपासणी सुरू आहे.

भोंदू कॅप्टन अशोक खरात यांनी कोपरगाव येथील समता पतसंस्थेत साठ बेनामी खाते उघडली होती. सिन्नर येथील जगदंबा पतसंस्थेत बत्तीस बेनामी खाते आहेत. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले होते.

मंगळवारी सकाळी ईडीकडून पुढील कारवाई करण्यात आली. 70 कोटी रुपयांचे व्यवहार आणि त्यातील बेनामी पैसे यांचा तपास करण्यासाठी अशोक खरातला गुपचूप मुंबईला हलविण्यात आले. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतल्यानंतर मुंबईच्या कार्यालयात खरातला नेण्यात आले. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर गोपनीयता पाळण्यात आली. यापुढे कॅप्टन खरात याच्या तपासाचे केंद्र आता मुंबई असेल.

Ashok Kharat shifted to Mumbai as investigating agencies intensify the ongoing probe.
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात चाकणकरानंतर दुसरी विकेट पडली; 15000 पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा नेत्यानं दिला राजीनामा

ईडीकडून बेनामी व्यवहारांची चौकशी होणार आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर तसेच त्यांच्या भगिनी आणि कोपरगाव येथील समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कुयटे यांची यापूर्वीच चौकशी झाली आहे. खरात याने दोन्ही पतसंस्थांमधील बेनामी पैशांचा वापर जमिनींच्या खरेदीसाठी केला आहे. या पैशांतून पत्नीच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. यातील अनेक व्यवहार अद्यापही पोलिस आणि ईडीच्या तपासापासून लांब आहेत. या व्यवहारांची माहिती उघड झालेली नाही.

राजकीय नेते रडावर?

ईडीचा तपास सुरू झाल्याने त्यात राजकीय अँगल शोधला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी यामध्ये तीन मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप यापूर्वीच केला आहे. याशिवाय विविध राजकीय पक्षांचा संबंध जोडला जात आहे. त्यामुळे कॅप्टन खरातच्या ईडीच्या तपासाने काही राजकीय नेत्यांना चांगलाच धसका घेतला आहे. यात काही राजकीय नेते रडारवर येतात का याची उत्सुकता आहे.

Ashok Kharat shifted to Mumbai as investigating agencies intensify the ongoing probe.
Ashok Kharat : अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलर घेऊनही फरक पडेना ; आता एकच पर्याय.. कोर्टात वकिलांनी केली विनंती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com