Ashok Kharat : अशोक खरातच्या बायकोला जामीन; कॅप्टन खरात मात्र कोठडीतच राहणार; सुनावणी लांबणीवर!

Ashok Kharat wife bail update : अशोक खरात प्रकरणात त्यांच्या पत्नीला जामीन मिळाला आहे. मात्र कॅप्टन खरात यांना कोठडीतच राहावे लागणार असून, प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
Ashok Kharat : अशोक खरातच्या बायकोला जामीन; कॅप्टन खरात मात्र कोठडीतच राहणार; सुनावणी लांबणीवर!
Published on
Updated on

Captain Ashok Kharat News: कॅप्टन अशोक खरात याच्या भोवती कायद्याचा फास आणखी घट्ट झाला आहे. त्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस नक्की झाला. विशेष प्रयत्न करू नये जामिनाची आशा आता मावळली आहे.

कॅप्टन खरातची पत्नी कल्पना खरात हिला यापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा मिळाला होता. आता दुसऱ्या प्रकरणात तिला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने परदेशवारीला मात्र मनाई केली.

Ashok Kharat : अशोक खरातच्या बायकोला जामीन; कॅप्टन खरात मात्र कोठडीतच राहणार; सुनावणी लांबणीवर!
Mumbai High Court decision : मिरवणुकांमधील डीजे, ढोलताशांबाबत हायकोर्ट कडक; मंडळाना डिपॉझिट, हमी द्यावी लागणार... वारीचाही दिला दाखला!

कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली. पोलिसांनी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोर्टात हजर केले होते. त्याची पत्नी कल्पना खरात ही मात्र प्रत्यक्ष न्यायालयात हजर होती.न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन यावेळी करण्यात आले. कॅप्टन खरात याच्या विरोधात महिलांचे लैंगिक शोषण तसेच हवाला रॅकेट, खंडणी आणि ईडीच्या चौकशीसह विविध 17 गुन्हे दाखल आहेत. त्याची जामिनाची विनंती न्यायालयाने काल पुन्हा अमान्य केली. या प्रकरणाची सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे.

अशोक खरात याच्यावर ईडीने तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. कोपरगाव तसेच कुंदेवाडी (सिन्नर) येथील दोन पतसंस्थांमधील बनावट खात्यांद्वारे पैसे अन्यत्र वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. यामध्ये खऱ्या त्याने 42.88 कोटी रुपयांचा हवाला व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ashok Kharat : अशोक खरातच्या बायकोला जामीन; कॅप्टन खरात मात्र कोठडीतच राहणार; सुनावणी लांबणीवर!
8th Pay Commission: अखेर प्रतीक्षा संपली? ८ व्या वेतन आयोगाबाबत नवीन नोटिफिकेशन जारी; कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

अशोक खरात सह अन्यसंशयतांमध्ये नामकर्ण यशवंत आवारे, अरविंद पांडुरंग चावके, अविनाश वामन कांडेकर, मिलिंद दादासाहेब बनकर आणि पत्नी कल्पना खरात हे आरोपी आहेत. मनी लॉन्ड्री प्रतिबंधक कायदा अन्वये दाखल केलेला गुन्हा अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. त्यात विविध राजकीय नेत्यांचाही जबाब नोंदविण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com