Ashok Kharat Wife : 19 गुन्हे, कोट्यवधींची संपत्ती अन् महिला शोषण… तरीही खरातची पत्नी सापडेना; प्रकरणात मोठी कारवाई कुठेही दिसेना?

women exploitation allegations against Ashok Kharat : अशोक खरात याच्यावर 19 गुन्ह्यांची नोंद, महिला शोषणाचे आरोप आणि कोट्यवधींच्या संपत्तीची चर्चा सुरू असताना त्याची पत्नी अद्याप सापडलेली नाही. तपास यंत्रणांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
ED Raid Shirdi
ED Raid ShirdiSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News : वादग्रस्त कॅप्टन खरात गेले नऊ महिने पोलीस, एसआयटी आणि इडीच्या कोठडीत होता. या सर्व तपासात नवे मुद्दे नसल्याने आता ईडीलाही त्याची कोठडी मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके हाती काय लागले? हा चर्चेचा विषय आहे. बंधू कॅप्टन अशोक खरात यांच्या बेनामी संपत्ती आणि महिला शोषणाचे 19 गुन्हे दाखल आहेत.


गेले 9 आठवडे तो विविध यंत्रणांच्या कोठडीत होता. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. एस आय टी पथकाचे 27 अधिकारी आणि नगर व नाशिक पोलिसांनी अशोक खरात याचा तपास केला. यामध्ये सातत्याने राजकीय नेते आणि अँगल चर्चेत होता. मात्र एकाही राजकीय नेत्याला अद्याप अटक झालेली नाही.

ED Raid Shirdi
Supreme Court on SIR : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; विरोधकांना दणका देत निवडणूक आयोगाची थोपटली पाठ...


राजकीय नेते अलिप्तच राहिल्याने तो चर्चेचा विषय आहे. भोंदू कॅप्टन अशोक खरात यांनी विविध मार्गाने कोट्यावधी रुपये जमाविले. सर्व संपत्ती त्याने पत्नी मंदाकिनी खरात या नावाने विविध जमिनी आणि व्यावसायिक मालमत्तांमध्ये गुंतविली. त्याचे सबळ पुरावे पुढे आले आहेत.

जवळपास अडीच महिने पोलिस आणि ईडी या यंत्रणांनी तपास करू नये खरात ह्याची पत्नी मात्र अद्याप कोणत्याही यंत्रणेच्या हाती लागलेली नाही. श्रीमती खरात यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. त्यानंतरही फारसे काही हाती लागलेली नाही.

ED Raid Shirdi
ACB News: धर्मभूमी नाशिकमध्ये लाचखोरीचा काळा चेहरा; गोशाळा अनुदानासाठी ‘माया’ मागणाऱ्या डॉक्टरला ACBच्या बेड्या

त्यामुळे कॅप्टन खरात प्रकरणात एसआयटी यंत्रणेने काय साध्य केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खरात याच्या विरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 19 गुन्हे दाखल आहेत. बेनामी संपत्तीचे प्रकरण इडी हाताळत आहे. खरात याच्या विरोधातील गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता जामीन मिळविणे सोपे नाही. खरात प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यामागील शासनाचा हेतू साध्य झाला की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com