
Congress News : महापालिका निवडणुकीसाठी नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. मात्र मालेगाव शहरात गेले वर्षभर त्यासाठी विद्यमान आणि माजी आमदारांसह विविध पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यासाठी रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
मालेगाव महापालिकेत काँग्रेस (Congress) पक्षाची माजी आमदार (कै) रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता होती. मात्र प्रशासकांच्या नियुक्तीनंतर शहरातील राजकीय स्थिती झपाट्याने बदलली. आता महायुती, महाविकास आघाडी आणि 'एमआयएम' अशी तिरंगी लढत होईल अशी चिन्हे आहेत.
माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा मुख्य उद्देश निधी मिळविणे हा होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे संबंध आजही टिकून आहेत. मात्र, राजकीय दृष्ट्या मालेगाव शहरात ते अडचणीचे असल्याने, माजी आमदार शेख सध्या स्वतंत्र "इस्लाम" हा पक्ष व सहकाऱ्यांचे आघाडी असे समीकरण आहे.
मालेगाव शहर गेले वर्षभर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनी घायाळ झाले आहे. सोमय्या सातत्याने मालेगाव शहरात हजारो बांगलादेशी नागरिक राहतात असा आरोप करत आहेत. त्यासाठी हजारो जन्मदक्षांची तपासणी झाली. नागरिकांना प्रचंड त्रास आणि जात सहन करावा लागला. त्यात अगदी शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली. हा येत्या महापालिका निवडणुकीतील मुख्य मुद्दा असेल.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार असिफ शेख, समाजवादी पक्षाचे मुस्तकीन डिग्निटी आणि अन्य नेते आक्रमकपणे हा किल्ला लढवत होते. 'एमआयएम' चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल या प्रश्नावर मवाळ दिसले. त्याचाच फायदा आसिफ शेख रोज नवे आरोप करून घेत आहेत. मध्ये काँग्रेसचे स्थान काय आणि कुठे हा चर्चेचा विषय होता.
यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. काँग्रेस पक्ष वरिष्ठ सांगतील त्या आघाडीसोबत असेल. अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि उमेदवार हा महत्त्वाचा विषय असतो. पक्ष दुय्यम असतो. त्यामुळे काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
मालेगाव महापालिका निवडणूक जाहीर व्हायचे आहे. मात्र येथील राजकारण वर्षभर आधीपासूनच तापले आहे. याबाबत माजी आमदार असिफ शेख आणि आमदार मौलाना मुक्ती यांच्यात सरळ लढत होईल असे वाटत होते. आता काँग्रेस या दोन्ही पक्षांत न जाता स्वबळावर तयारी करीत आहे. त्यामुळे मालेगाव महापालिकेची निवडणूक तिरंगी होईल, हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.