Nashik News, 02 Nov : उमेदवारांना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) अंगलट येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधील उमेदवारांसाठी शिंदेसेनेने हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले होते.
या प्रकरणाची चौकशी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवळी काही वेळ उरला असताना दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते.
हेच एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवल्या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) विचारणा होताच जिल्हा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली आहे. प्रशासनाने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भातील सविस्तर माहिती मागवली आहे.
तसंच हेलिकॉप्टरने एबी फॉर्म कुणी आणले? त्यात कोण कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी ते फॉर्म आणण्यात आले? त्याला किती खर्च आला? याबाबतची चौकशी आता केली जाणार आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिंदेसेनेला कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.