Devendra Fadnavis : 'या' नेत्यांच्या भेटीसाठी फडणवीस तातडीने पुण्याला रवाना, दौऱ्यामागचं कारण काय?

Pune BJP Politics : उमेदवारी न मिळालेल्या महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले असले तरी भाजपमधील नाराज नेत्यांनी बंडखोरी करणं टाळलं आहे. असं असलं तरी हे नेते प्रचारात सक्रिय न झाल्यास त्याचा फटका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे या नेत्यांची नाराजी दूर करणं महत्त्वाचं आहे.
DCM Devendra Fadnavis
DCM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Nov : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी पुण्यात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते भाजपमधील काही नाराज नेत्यांची व्यक्तिगत भेट घेणार आहेत. तसेच उमेदवारांना विजयासाठी कानमंत्र देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस शनिवारी पुण्यात दाखल होत आहेत. नाराज नेत्यांशी ते व्यक्तिगत संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तसंच त्यांना प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना देखील देणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुणे (Pune) शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपकडून तीन ते चार इच्छुक नेते आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आस लावून होते. मात्र, उमेदवारीची माळ गळ्यात न पडल्याने हे नेते नाराज आहेत.

उमेदवारी न मिळालेल्या महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरले असले तरी भाजपमधील नाराज नेत्यांनी बंडखोरी करणं टाळलं आहे. असं असलं तरी हे नेते प्रचारात सक्रिय न झाल्यास त्याचा फटका निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे या नेत्यांची नाराजी दूर करणं महत्त्वाचं असल्याने फडणवीस स्वतः पुण्यात येणार आहेत.

DCM Devendra Fadnavis
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : ठरलं..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतूनच शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडणार

कसबा विधानसभा मतदारसंघातून (Kasba Assembly Election) भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक होते, तर पर्वतीमधून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. कोथरूडमधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले होते तर शिवाजीनगर मधून माजी नगरसेवक सनी निम्हन यांनी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने काँग्रेस कडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न देखील केला होता.

तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्या ठिकाणी माजी आमदार जगदीश मुळीक नाराज आहेत. या सर्व नाराजांची आज देवेंद्र फडणवीस व्यक्तिगत भेट घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. या सर्व नाजाराजांना प्रचारात सक्रिय होण्याचा फडणवीस देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

DCM Devendra Fadnavis
Assembly Election 2024 : शिंदेंच्या 'या' उमेदवाराच्या शपथपत्रात 16 प्रकारच्या गंभीर चुका, निवडणूक आयोगाने दिला 24 तासांचा वेळ

त्यासोबतच ते पुण्यातील विधानसभेची उमेदवारी मिळालेल्या नेत्यांची देखील फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे .या नेत्यांची भेट घेऊन प्रचार यंत्रणा कशी राबवावी कशा प्रकारे नागरिकांशी संवाद साधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा यासारख्या महत्वाच्या सूचना ते उमेदवारांना देणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com