Devyani Pharande Politics: भाजपकडे आमदार फरांदे यांना कोणता पर्याय; काँग्रेस इच्छुक संपर्कात असल्याची चर्चा!

MLA Farande Replacement : नाशिक मध्य मतदार संघातून भाजपचे इच्छुक जिद्दीला पेटले, आमदार फरांदे यांच्या अडचणीत वाढ?
Laxman Savji, Devyani Pharande & Suresh Patil
Laxman Savji, Devyani Pharande & Suresh PatilSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics: नाशिक मध्य मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा विषय होत चालला आहे. महाविकास आघाडीने त्यावर तोडगा काढला. मात्र भारतीय जनता पक्षाला अद्यापही याबाबतचा निर्णय घेता आलेला नाही. यामध्ये मोठा ट्विस्ट येऊ शकतो.

नाशिक मध्य मतदार संघात सध्या भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. पक्षाने अन्य विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आमदार फरांदे यांना अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही.

पक्षाने केलेल्या तीन अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार त्यासाठी घेण्यात आल्याचे बोलले जाते, असे कळते. भाजपच्या या निर्णयावर आमदार फरांदे चांगल्याच संतापल्या आहेत. गेले दोन दिवस त्या मुंबईत तळ ठोकून आहेत.

कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी यासाठी आमदार फरांदे नेत्यांचा पिच्छा पुरवला आहे. त्यांनी सोबत शहरातील काही माजी नगरसेवक देखील नेले होते. मात्र भाजपचे अन्य इच्छूक देखील इरेला पेटले आहे.

Laxman Savji, Devyani Pharande & Suresh Patil
Sharad Pawar Politics : राणी लंकेंना 'तुतारी'चा 'AB' फॉर्म; 'मविआ'तील इच्छुकांचं काय होणार?

या इच्छुकांचा विद्यमान आमदार फरांदे यांना तीव्र विरोध आहे. महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी यासंदर्भात जोरदार प्रयत्न केले आहेत. पक्षाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी बदलण्यासाठी इशारा दिला आहे.

नाशिक मध्य मतदारसंघ जागावाटप आणि उमेदवारी याचा निर्णय आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. तशी मानसिक तयारी इच्छुकांनी देखील ठेवली आहे. त्यामुळे आमदार फरांदे यांच्यासाठी पुढील दोन दिवस त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे आहेत.

दरम्यान आमदार फरांदे यांना पर्याय म्हणून भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी देखील पुढाकार घेतला आहे. काँग्रेसच्या इच्छुक असलेल्या एका महिला उमेदवाराशी महाजन यांच्या वतीने काही नेते संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे.

Laxman Savji, Devyani Pharande & Suresh Patil
Sharad Pawar politics: ठरले, सिन्नरमध्ये उदय सांगळे यांच्या हाती पवारांची तुतारी!

महाविकास आघाडीत मात्र या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात चुरस होती. काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नाही, हा ठाकरे पक्षाचा प्रमुख आक्षेप होता. त्यामुळे मंगळवारी रात्री झालेल्या चर्चेत नाशिक मध्य मतदार संघ व उमेदवार याबाबत महाविकास आघाडीने सामापचाऱ्याने तोडगा काढला आहे. भाजप मात्र अद्यापही उमेदवारीचा निर्णय घेण्यासाठी चाचपडताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com