Bandukaka Bacchhav politics: एकीकडे दादा भुसेंच्या कोट्यावधींच्या सरकारी घोषणा... दुसरीकडे पराभूत बंडूकाका बच्छाव स्वखर्चाने देणार आदिवासींना घर!

Bandukaka Bachhav; Defeated Bandukaka Bachhav is active in Minister Dada Bhuse's constituency-राज्यात कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र उपक्रम सुरू तर मालेगाव बाह्य मतदारसंघात आदिवासी, कृष्ठरोग पीडितांना काढले गावाबाहेर.
Bandukaka Bacchhav
Bandukaka BacchhavSarkarnama
Published on
Updated on

Bandukaka Bachhav News: मालेगाव बाह्य मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी मतदारसंघासाठी कोट्यावधींच्या कामांच्या घोषणा केल्या आहेत. मात्र उपेक्षित मतदारांना येथे कोणीच वाली नाही असे सध्याचे चित्र आहे.

मालेगाव बाह्य मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे विजयी झाले. सध्या ते राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहे. सत्तेत असल्याने कोट्यावधींची विकास कामे मतदार संघात घोषित करण्यात आली आहेत. मात्र त्याचवेळी विरोधाभासी चित्र देखील पहायला मिळाले.

या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अद्वय हिरे सध्या कोणाच्याच संपर्कात नाही. या स्थितीत अपक्ष आणि पराभूत उमेदवार बंडूकाका बच्छाव हे मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम हाती घेतला.

Bandukaka Bacchhav
Loudspeaker on Mosque: सुखद; तुम्हाला माहिती आहे का? ‘हा’ जिल्हा होतोय भोंगेमुक्त मंदीरे अन् मशिदींचा!

मतदारसंघातील वळवाडी गावात आदिवासी आणि कुष्ठरोग पीडित राहतात. त्यांनी गावातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी गावाबाहेर जाण्यास भाग पाडले. या पिडीतांना सध्या गावाबाहेर माळरानावर राहणे भाग पडले आहे. हे पीडित अतिशय बिकट स्थितीत जगत आहेत. त्यांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते आणि बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडूकाका बच्छाव धावून आले आहेत.

Bandukaka Bacchhav
Nashik crime: धक्कादायक; मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जिल्ह्यातच तोतया ‘एफडीए’ अधिकाऱ्यांचे फुटले पेव, मंत्रालयापर्यंत लिंक?

या आदिवासी आणि कुष्ठरोग पिढीत नागरिकांची त्यांनी भेट घेतली. त्यांची अवस्था आणि डोक्यावर छत नसल्याने अतिशय बिकट स्थितीत ते असल्याचे आढळले. धीर देत या पिडीतांना घरे बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आश्वासनावर न थांबता त्यांनी घरांसाठी जागाही निवड केली आहे.

सध्या बेघर असलेल्या या पिडीतांना त्यांनी स्वखर्चाने कपडे, अन्नधान्य, कपडे, सौर उर्जेवर चालणारे दिवे आणि जीवनाशक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. बंडूकाका बच्छाव समर्थक या कामात सध्या व्यग्र झाले आहेत. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचा या लोकांना विरोध असतानाही बच्छाव समर्थकांनी हे काम हाती घेतले आहे.

श्री बच्छाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. एकेकाळी मंत्री बच्छाव यांचे विश्वासू सहकारी असलेल्या बच्छाव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दादा भुसे यांना झुंजवले. बच्छाव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार हिरे हे कोणाच्याच संपर्कात नाहीत. श्री बच्छाव मात्र पराभूत झाल्यावरही लोकांच्या सेवेत सक्रिय झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com