- अरविंद जाधव
Sanjay Raut : नरेंद्र मोदी दौऱ्यावर येत आहेत. नाशिककरांनी त्यांच्याकडे अपेक्षा करणे गैर नाही. मात्र मोदींनी पंतप्रधान पदाचा मान राखून तसे वागावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अश्रू आणि कांदा भाव या आर्थिक संकटामुळे निर्माण झालेले प्रश्न भाजपा नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहचावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शिर्डी दौऱ्यावर जात असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चर्चा झाली असून, महाविकास आघाडीत एक मत आहे. अकोला ही जागा पंरपरेनुसार आंबेडकर लढतात. त्यामुळे त्यांनीच ती लढावी असे स्पष्ट केले.
दक्षिण मुंबई जागेचा प्रश्न
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत खासदार आहेत. याच जागेवरून सध्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, अरविंद सावंत दोन टर्मपासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तेथे सेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेसने मिलींद देवरा यांच्याबाबत अधिकृतपणे चर्चा केल्याची काही माहिती नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्या न्यायमुर्तींना न्याय करायचा, त्यांनाच आरोपी कसे भेटतात
आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी हल्लाबोल केला. न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहचली आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले आणि अचानक मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटले. ज्या न्यायमुर्तींना न्याय करायचा त्यांनाच आरोपी कसे भेटतात. त्यामुळेच आम्ही संविधान धोक्यात असल्याचे म्हणतो असे राऊत यांनी स्पष्ट केले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.