MLC Election : गावितांच्या वर्चस्वाला शिंदेंचा धक्का; रघुवंशींना आमदारकी देऊन वाढवली शिवसेनेची ताकद

Chandrakant Raghuwanshi : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून गावित कुटुंबियांच्या ताकदीला उतरती कळा लागली. याचे कारण ठरले ते चंद्रकांत रघुवंशी. हेच चंद्रकांत रघुवंशी आता शिवसेनेचे आमदार होणार आहेत.
Heena Gavit, Vijay Gavit, Eknath Shinde
Heena Gavit, Vijay Gavit, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

MLC Election : धुळे आणि नंदुरबार आधी एकत्र जिल्हा होता तेव्हाही आणि नंदुरबार स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला तेव्हापासूनच सातपुड्याचा हा अतिदुर्गम भाग काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. लक्ष्मण वळवी, तुकाराम गावित, स्वरुपसिंह नाईक, माणिकराव गावित, बेटसिंह रघुवंशी, चंद्रकांत रघुवंशी, रोहिदास पाटील अशा नेत्यांनी इथे काँग्रेसचे नेतृत्व केले. पण 2014 मध्ये भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला.

जवळपास 15 वर्षे मंत्री राहिलेले विजयकुमार गावित भाजपवासी झाले. त्यांची मुलगी हिना याही भाजपच्या खासदार झाल्या. 2019 मध्येही त्या पुन्हा खासदार झाल्या. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये विजयकुमार गावित पुन्हा मंत्री झाले. तर त्यांची दुसरी मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. जिल्ह्यावर एक प्रकारे भाजपचे आणि गावित कुटुंबांचे वर्चस्व तयार झाले.

Heena Gavit, Vijay Gavit, Eknath Shinde
MLC Election : अजितदादांचं धक्कातंत्र : चर्चेतील नावे मागे टाकत काढला हुकमाचा एक्का; विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून गावित कुटुंबियांच्या ताकदीला उतरती कळा लागली. याचे कारण ठरले ते चंद्रकांत रघुवंशी. हेच चंद्रकांत रघुवंशी आता शिवसेनेचे आमदार होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. रघुवंशी यांच्या आमदारकीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या दोन होणार आहे.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असताना चंद्रकांत रघुवंशी यांनी जवळपास 6 वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1998 साली काँग्रेसकडून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले. 2004 आणि 2014 मध्ये काँग्रेसने त्यांना पुन्हा विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. रघुवंशी यांची नंदुरबार शहर आणि परिसरात मोठी ताकद आहे.

रघुवंशी यांची पंधरा वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती सत्ता अबाधित आहे. त्यांच्या पत्नी सलग चार वेळा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांचे चिरंजीव राम रघुवंशी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सदस्य होते. 2022 मध्ये चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार आणि धडगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली.

Heena Gavit, Vijay Gavit, Eknath Shinde
BJP Politics : विधानसभेला बंडखोरीचा इशारा अन् आता विधानपरिषदेत संधी! अमित शहांनी दिल्लीला बोलावून समजूत काढलेले दादाराव केचे कोण?

नंदुरबारची बाजार समितीही चंद्रकांत रघुवंशी यांनी जिंकली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रघुवंशी यांचा हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण त्यानंतरही भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या उमेदवाराचे काम केले. गावित यांचा पराभव झाला.

गावित यांनी विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली. त्यातही रघुवंशी यांनी शिवसेना उमेदवार आमश्या पाडवी यांच्या मागे ताकद उभी केली. त्यामुळे इथेही हिना गावित यांचा पराभव झाला. याचमुळे गावित यांचा रघुवंशी यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी रघुवंशी यांना विधान परिषदेवर चौथ्यांदा काम करण्याची संधी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com