Shirdi Lok Sabha Elections 2024 Winner : 'कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या'; निष्ठावंतांनो तुम्ही 'खासदारकी' घ्या!

Bhausaheb Wakchaure Wins In Shirdi Election : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांचा पराभव झाला.
Bhausaheb Wakchaure
Bhausaheb Wakchauresarkarnama

Shirdi Lok Sabha Elections Result Live: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीचे दिशेने ठाकरेंनी दिलेली 'मशाल' घेऊन निघाले आहेत. त्यांनी 4 लाख 76 हजार 900 मते घेत विजय मिळवला. याचबरोबर खासदार सदाशिव लोखंडे यांची हॅटट्रिकची संधी हेरावून घेतली.

शिवसेना फुटीनंतर शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यानंतर ठाकरेंचा येथून उमेदवार कोण, असा प्रश्न असतानाच माजी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर ठाकरेंनी शिक्कामोर्तब केले.

वाकचौरे यांच्या नावाला सुरूवातीला विरोध झाला. पण तो, ठाकरेंनी त्यांच्या आदेशातून मोडून काढला आणि महाविकास आघाडीत एकसंघपणा आला. निवडून तोंडावर आली असतानाच ठाकरेंबरोबर असलेल्या जुन्या शिलेदारांनी त्यांची साथ सोडली.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना देखील महायुतीतून विरोध झाला. यातच महायुतीमधील रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला. याशिवाय भाजपने उमेदवार बदण्याचा आग्रह धरला होता.

परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी ही जागा खेचून आणत लोखंडे यांनी पुन्हा संधी दिली. सदाशिव लोखंडे यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी होती. संपर्कात नसलेला खासदार, असे त्यांच्याविषयी सर्वसामान्यांचे मत होते. त्याचा फटका सदाशिव लोखंडे यांना बसला आणि त्यांची खासदारकीची हॅटट्रिकची हुकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhausaheb Wakchaure
Nashik Lok Sabha Election Result : नाशिककरांनी केला 'खुद्दार' अन् 'गद्दार'चा फैसला; ठाकरे ठरले शिंदेंवर भारी!

सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात सरळ लढत होईल, असे वाटत असतानाच वंचितकडून उत्कर्षा रुपवते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आल्या. वंचितचा फटका महाविकास आघाडीला बसेल, असे सांगितले जात होते.

परंतु त्याचा सरळ-सरळ फटका महायुतीला बसला. उत्कर्षा रुपवते यांना लाखाच्या घरात मताधिक्य मिळाले. शिर्डीमध्ये महाविकास आघाडी एकसंघ दिसत होती. त्यातुलनेत महायुतीत अंतर्गत कलह सुरू होता. यावर सदाशिव लोखंडेकडून काम झाले नाही. परिणामी त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.

मतमोजणीच्या सुरूवातीपासून भाऊसाहेब वाकचौरे लीड होते. सदाशिव लोखंडे यांना फक्त पोस्टल मतदानांमध्ये अधिकचे मते मिळाली. परंतु 'ईव्हीएम'वरील मतमोजणीत वाकचौरे लीडवर राहिले. सदाशिव लोखंडे यांना त्यांच्या मतदानाजवळ देखील देखील जाता आले नाही.

एवढी मते पडली :

- भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे पक्ष) : 4 लाख 76 हजार 900 (विजयी)

- सदाशिव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) : 4 लाख 26 हजार 371

- उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी) : 90 हजार 929

- नोटा : 5 हजार 380

Bhausaheb Wakchaure
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : राणी लंकेंचे विखेंना 'रिटर्न गिफ्ट'; उत्तरेचं पार्सल उत्तरेला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com