Nashik Lok Sabha Election Result : नाशिककरांनी केला 'खुद्दार' अन् 'गद्दार'चा फैसला; ठाकरे ठरले शिंदेंवर भारी!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : नाशिक लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सलग वीस वर्ष अधिराज्य कायम
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarakarnama

Maharashtra Loksabaha Election Result 2024 : महाराष्ट्रात प्रचाराला आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना नकली असे संबोधले होते. मात्र नाशिकच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला कौल देत एकप्रकारे मोदींचे वक्तव्य खोटे ठरवले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे दोन लाखांहून अधिक मताधिक्य घेत विजयाजवळ पोहोचले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर शिवसेना(Shivsena) विरुद्ध शिवसेना अशीच होती. या निवडणुकीच्या निकालावरून असली आणि नकली कोण? हे तिथे स्पष्ट होणार होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठी खेळी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने बंडखोरी केली. ते भाजप समवेत सत्तेत सहभागी झाले. मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणूक आयोगाने खरी शिवसेना असे संबोधले.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Nashik Lok Sabha Result 2024 : हेमंत गोडसेंना 'धोका', सीएमच्या दीड डझन बॅगाही झाल्या फेल!

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे(Rajabhau Vaje) विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा पराभव केला आहे. यामधून मतदारांनी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनाच असली असा संदेश दिल्याचे म्हणावे लागेल .

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती १९९० मध्ये झाली. तेव्हापासून नाशिक मतदार संघ भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे राहिला आहे. आतापर्यंत येथे पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.

नाशिक मतदारसंघात सर्वप्रथम १९९६ मध्ये राजाभाऊ गोडसे (२,९५,०४४ मते) विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे डॉ वसंत पवार यांचा पराभव केला. त्यानंतर १९९९ मध्ये उत्तमराव ढिकले (३,०३,०८४ मते), २०१४ मध्ये हेमंत गोडसे (४,९४,७३५ मते) आणि २०१९ मध्ये पुन्हा गोडसे (५,६३,५९९ मते) विजयी झाले होते.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Nashik Loksabha : हेमंत गोडसे गारद! राजाभाऊ 'जायंट कीलर'

यंदाच्या निवडणुकीत खासदार गोडसे यांनी निवडणुकीच्या काही महिने आधी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून गेला. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गट महायुतीचा घटक आहे. त्यामुळे विद्यमान खासदार असूनही या जागेवर प्रारंभी भाजप नंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दावा केला होता.

या राजकीय वादात गोडसे यांची उमेदवारी संकटात सापडली. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी मिळाली. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने प्रचारात गोडसे यांना गद्दार संबोधले. "गद्दार विरुद्ध खुद्दार" अशी ही निवडणूक करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना "नकली" संबोधले. शेवटी आजच्या निकालातून गद्दार आणि नकली या दोन्हींचा खुलासा झाला आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी राजकीय बळ आणि आत्मविश्वास देणारा मोठा विजय आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com