Uddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदे गटात जाणार?

Uddhav Thackeray News : संजय राऊत यांनी ट्विटरवरून सांगितलं...
 Uddhav Thackeray,  Sanjay Raut, Latest News
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांना सध्या धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि ठाकरे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) नाशिक (Nashik) संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून भाऊसाहेब चौधरी शिवसेना (ठाकरे गट) नाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत होते. मात्र ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे चौधरी यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

 Uddhav Thackeray,  Sanjay Raut, Latest News
Danve On Raut News : राऊतांचं काही खरं नाही, आता दानवेंनीही दिला इशारा..

याबाबत माहिती सांगताना संजय राऊत ट्विटरवर म्हणाले, ''शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे,'' असं ते म्हणाले.

 Uddhav Thackeray,  Sanjay Raut, Latest News
Raj Thackeray : सोशल मीडियावर गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना दम

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे बारा नगरसेवक शिंदे गटात गेले होते. त्यानंतर आता भाऊसाहेब चौधरी देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर नाशिकमध्ये शिंदे गटाला मोठं बळ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com