शाईफेक शिवसेनेवर, मोर्चा मात्र काढला भाजपने!

शिवसेनेच्या शालिनी भदाणेंवर ठाकरे गटाकडून झालेल्या शाईफेकीचा भाजपने केला निषेध
BJP Agitation
BJP AgitationSarkarnama
Published on
Updated on

धुळे : चार दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद (Zillha parishad) अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्यात चांगलेच राजकीय नाट्य रंगले आहे. यावेळी शालीनी भदाने (Shalini Bhadane) स्वपक्ष शिवसेनेला मतदान न करता तटस्थ राहिल्या. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली होती. शाईफेक शिवसेनेने शिवसेनेवर केली मात्र त्यावर संताप भाजपने व्यक्त केला आहे. (BJP agitation against Shivsena Thackray members)

BJP Agitation
AIMIM: भाजपच्या खासदारांनी धुळे शहराचा विकास रोखला?

बोरकुंड (ता. धुळे) गटातील जिल्हा परिषद सदस्या शालिनी बाळासाहेब भदाणे यांच्यावरील हल्लाप्रकरणी महिलांनी आज एकीची वज्रमूठ दाखवली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तालुक्यातील महिला तीव्र जनआंदोलन उभारतील, असा इशारा आक्रोश मोर्चातील आंदोलकांनी केला. या मोर्चात भाजपचे नेते खासदार डॉ. सुभाष भामरे सहभागी झाले.

BJP Agitation
काँग्रेसला खिंडार; नंदुरबार जि. प. वर भाजपची सत्ता

जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर मतदान प्रकरणी सदस्या शालिनी भदाणे यांच्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली. या पार्श्वभूमीवर महिला सन्मान व संरक्षण समितीतर्फे या घटनेच्या निषेधासह आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. काळ्या फिती लावून निघालेला निषेध मोर्चा अग्रवाल विश्राम भवनापासून झाशीची राणी चौकमार्गे क्युमाईन क्लबजवळ पोचला. नंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

महिला वर्गावर हल्ला

निवेदनात म्हटले आहे, स्वत:ला शिवसैनिक म्हणविणाऱ्या सुपारीबहाद्दरांनी सौ. भदाणेंवर केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे जिल्ह्यातील महिला वर्ग व तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. हा केवळ सौ. भदाणेंवर नाही, तर महिलांच्या सन्मानावर झालेला हल्ला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेत महिलांच्या सन्मानाची परंपरा आहे. परंतु, हल्लेखोर पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेतील महिलाच सुरक्षीत नाहीत, असे दिसते. निवडणूक काळात स्वत:ची बोली लावण्याचा ज्यांचा इतिहास आहे, अशा नकली शिवसैनिकांनी हा हल्ला केला आहे. तथाकथित सुपारी बहाद्दरांनी केलेल्या भ्याड हल्लाचा बोरी परिसरासह तालुक्यातील महिला व ग्रामस्थ, निष्ठावान शिवसैनिक निषेध करीत आहेत.

काय आहे प्रकरण...

धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे. भाजपने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिला होता. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या सुनात सोनवणे या उमेदवार होत्या. मतदानाच्या वेळी शालीनी भदाणे यांनी शिवसेनेच्या उमेदवारा मतदान न करता तटस्थ राहिल्या. त्यामुळे शिवसेनेचा आदेश झुगारल्याने शिवसेनेच्या महिला सदस्य संतापल्या होत्या. त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सभेत खासदार डॉ. भामरे, धनश्री राजपूत, जिजाबराव माळी, रुखमाबाई माळी, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, संजय शर्मा, बापू खलाणे, धनूरच्या सरपंच सत्यभामाबाई शिंदे, रावसाहेब राऊळ, आबा कवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.

महिला सदस्यांवर भ्याड हल्ले होणार असतील तर भविष्यात त्या राजकारणात कशा येतील? अशा प्रकारचा हल्ला ही गंभीर बाब असून, हल्लेखोरांवर केवळ गुन्हा दाखल होणे पुरेसे नसून, त्यांच्यावर कठोर कारवाई अपेक्षित आहे. यापुढे राजकीय खोडा घालणाऱ्या व अंगावर येणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.

- बाळासाहेब भदाणे, बोरकुंड

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com